इम्रान खानची पुन्हा ‘पोकळ’ धमकी ! काश्मीर मुद्यावर साथ दिली तर जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील

नवी दिल्ली वृत्तसंस्था – जम्मू – काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून, पाकिस्तान चांगलाच खवळला आहे. तो सतत अण्वस्त्र हल्ल्याची पोकळ धमकी देत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा युद्धाचा इशारा दिला आहे. इम्रान म्हणाले की काश्मीरवरील भारताची चाल रोखण्यासाठी जगाने काही केले नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील.

गुरुवारी एका इंग्रजी वृत्तपत्रातील एका लेखात इम्रान खान यांनी पुन्हा चेतावणी दिली की जर काश्मीरबाबतच्या भारताच्या निर्णयाला जगाने काही थांबवले नाही तर दोन्ही अण्वस्त्र संपन्न देश युद्धाच्या जवळ पोहचतील, याचा संपूर्ण जगावर गंभीर परिणाम होईल.

भारतासोबत तेव्हाच चर्चा होणार जेव्हा काश्मीरबाबतचा निर्णय बदलला जाईल
इम्रान खान पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटविण्याच्या निर्णय जर भारत बदलणार असेल, आणि तेथील बंधने रद्द करणार असेल तसेच तेथील सैन्य मागे घेणार असेल तरच त्याच्याशीच चर्चा होऊ शकते. इम्रान म्हणाला,संवादाच्या वेळी सर्व प्रतिनिधी खासकरून काश्मिरी सहभागी झाले पाहिजेत.

पाकिस्तान ने बनवला ‘कश्मीर ऑवर’
ते म्हणाले चर्चा तेव्हाच सुरु होईल जेव्हा, भारत काश्मीरवरील अवैध कब्जा मागे घेत, कर्फ्यू काढून आपले सैन्य माघारी घेईल. पाकिस्तानने काश्मिरी जनतेशी एकता दाखवण्यास शुक्रवारी ‘कश्मीर ऑवर’ साजरा केला. इस्लामाबादच्या कॉन्स्टिट्यूशन एव्हेन्यू येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे इम्रान खान यांनी ध्वजारोहण केले आणि घोषणाबाजी करत जमावाला संबोधित केले.

काश्मिरींसोबत आहे पाकिस्तान
इम्रान खान म्हणाले, आज संपूर्ण पाकिस्तान, जिथे जिथे पाकिस्तानी आहेत तिथे ते आपले विद्यार्थी, दुकानदार किंवा कामगार असोत, आज आपण सर्व आपल्या काश्मिरींबरोबर उभे आहोत. ते म्हणाले, “आमचे काश्मिरी कठीण काळातून जात आहेत. गेल्या चार आठवड्यांपासून सुमारे 80 लाख काश्मिरींना कर्फ्यूमध्ये ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान म्हणाले की, ‘कश्मीर ऑवर’ साजरा करण्याचा उद्देश पाकिस्तानकडून हा संदेश पाठविणे आहे की देश काश्मिरींच्या पाठीशी उभा राहील.

कलम 370 रद्द केल्यामुळे मोठा तणाव
भारताने कलम 370 काश्मीरमधून रद्द केल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण वाढले आहे. त्यामुळे दोनीही देशांची चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात होत आहे.