विरोधी पक्ष पाकचे पंतप्रधान इम्रान खानसोबत ‘सहमत’, 3 वर्षे वाढणार जनरल बाजवा यांचा ‘कार्यकाळ’ !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानात सत्तेत असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचं सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या कार्यकाळ निश्चिती आणि मुदतवाढीसाठी लष्कर कायद्यातील प्रस्तावित सुधारणांना घेऊन एकमत झालं आहे. मीडिया रिपोर्टमध्ये शुक्रवारी ही माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 19 ऑगस्ट रोजी एका अधिसूचनेद्वारे 59 वर्षीय जनरल बाजवा यांचा कार्यकाळ वाढवला होता. परंतु मुदतवाढ प्रक्रियेत अनियमितता दर्शवत सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश निलंबित केला होता.

सरकारनं सर्वोच्च न्यायालयला लष्करप्रमुखांच्या मुदतीवाढीसाठी कायदा करण्याचं दिलं होतं आश्वासन

बुधवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत लष्कर कायद्यात दुरुस्ती करण्याला मान्यता देण्यात आली. याच्या जवळपास चार आठवड्यांपूर्वी सरकरानं सर्वोच्च न्यायालयाला 6 महिन्यांच्या आत लष्करप्रमुखांच्या मुदतवाढ आणि नियुक्तीबाबत कायदा मंजूर करण्याचं आश्वासन दिलं होतं. डॉनच्या रिपोर्टनुसार, लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचा कार्यकाळ 3 वर्ष वाढवून देण्यासंबंधी विधेयक संसदेत सादर करण्याच्या एक दिवस आधी गुरुवारी सरकार आणि विरोधी पक्षात एकमत झालं.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे आहे कोणत्याही सेवेत मुदवाढ देण्याचा विशेषाधिकार

पाकिस्तान लष्कर दुरुस्ती कायदा 2020 नावाच्या या कायद्याद्वारे तिन्ही सेनाप्रमुख आणि जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमेटीचे चेअरमन यांच्यासाठी सेवेत राहण्याचं कमाल वय 64 वर्षे करण्यात आलं आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांकडे एखाद्या अधिकाऱ्यानं वयाच्या 60 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर कोणत्याही सेवेत मुदतवाढ देण्याचा विशेषाधिकार असतो. ज्यावर राष्ट्रपती आपली अंतिम मंजुरी देतात. याबाबात बोलताना पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं की, “64 वर्षे कमाल वयाचा कार्यकाळ त्याच अधिकाऱ्याला मिळतो ज्याला सरकार सेवेत मुदतवाढ देईल.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/