कलम 370 वरून इम्रान खानच्या पुर्वाश्रमी पत्नीचे गंभीर आरोप ; म्हणाली, PM मोदींसोबत केलं ‘डील’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इमरान खानची पूर्वाश्रमी पत्नी रेहम खान यांनी पाकचे पंतप्रधान इमरान खान आणि पंतप्रधान मोदींवर काश्मीर संबंधित मुद्यावर गंभीर आरोप केला आहे. रेहम खान यांनी इमरान खान आणि पंतप्रधान मोदींवर धक्कादायक आरोप करताना म्हणले आहे की इमरान खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काश्मीर मुद्यावर एक गोपनीय डील म्हणजेच करार झाला आहे. त्यांनी दावा केला आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी इमरान खान यांनी हे डील केले आहे. या कारणाने ते कलम ३७०रद्द करण्याच्या कृतीला जोरदार विरोध करत नाहीत आणि कोणतेही ठोस पाऊल उचलत नाहीत.

जम्मू काश्मीरसंबंधित कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा मांडून भारताच्या भूमिकेला विरोध करु पाहत आहे. परंतू पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून कोणतीही मदत मिळेनाशी झाली आहे.

परंतू आता जम्मू काश्मीर मुद्द्यावर इमरान खान यांच्या पूर्वाश्रमी पत्नीने पाक पंतप्रधान इमरान खान आणि पंतप्रधान मोदी यांच्यात डील झाल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या खळबळ उडवून देणाऱ्या दाव्याने आता भारतात विरोधकांना टीका करण्यास नवा मुद्दा मिळाला आहे. पाक पंतप्रधान इमरान खान यांच्या पूर्वाश्रमी पत्नीने इमरान खान यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, रेहम खान या स्वत: पत्रकार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त