अखेर काही दिवसातच ‘जिरली’, भारतासमोर पाकिस्तान ‘नतमस्तक’ !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे ३७० हे कलम रद्द केले. त्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेतील पाकिस्तानने काही अति टोकाचे निर्णय घेतले होते. जे आता त्याच्याच मुळावर बसत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला भारतासमोर पुन्हा एकदा नांगी टाकावी लागली आहे.

काश्मीर हा आतंरराष्ट्रीय विषय आहे. हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानने आपल्याकडून शक्य तेवढे सर्व प्रकारचे प्रयत्न करून बघितले. परंतु पदरी अपयशच आले. त्यामुळे पाकिस्तानने काही तडकाफडकी निर्णय घेतले. जसे की, पाकिस्तानने भारतासोबत केले जाणारे सर्व व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पाकिस्तान मध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू लागल्यामुळे काही दिवसातच भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरु केला आहे.

पाकिस्तानच्या व्यापार मंत्रालयाने सोमवारी एक अध्यादेश काढून भारतात तयार होणाऱ्या औषधांच्या आयात-निर्यातीला परवानगी दिली आहे. पाकिस्तान हा भारतात तयार होणाऱ्या जीवनावश्यक औषधांची आयात करणारा एक मोठा आयातदार देश आहे. या बाबतीत पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या १६ महिन्यात पाकिस्तानने भारताकडून तब्बल २५० करोड रुपयांहून अधिक फक्त रेबीज आणि इतर काही औषधांची खरेदी केली होती.

हे घडणारच होते
जेव्हा सर्व पर्याय बंद होतात तेव्हा पूर्वी उपलब्ध असलेल्याला पर्यायांचाच विचार करावा लागतो. त्याप्रमाणे पाकिस्तानने भारताकडून पुन्हा जीवनावश्यक औषधे घेण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानमधील आघाडीचे वृत्तपत्र डॉन मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीप्रमाणे भारताकडून औषधे आयात करणे थांबवल्यास पाकिस्तानमध्ये औषधांचा तुटवडा पडणार हे खरे ठरले. त्यामुळे जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत पाकिस्तानला भारताकडून जीवनावश्यक औषधे आयात केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळंच पर्यायी व्यवथा सुरु होईपर्यंत EFP ने आयातीमध्ये सवलती दिल्या पाहिजेत असे म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like