पाकिस्तानात मोठी विमान दुर्घटना, प्रवासी विमान कोसळले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. लाहोरहून कराचीला जाणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) चे विमान कोसळले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात कराची विमानतळाजवळ झाला आहे. या दुर्घटेनेने किती जिवीत हानी झाली याची माहीत अद्याप समजू शकली नाही.

पीआयएचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी अपघाताची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, ए -320 हे विमानात 90 प्रवासी होते. सिंधचे आरोग्यमंत्री मिडिया कोऑर्डिनेटर मीनर युसूफ यांनी विमान अपघाताची माहिती मिळताच कराचीतील सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या आरोग्य व लोकसंख्या कल्याण मंत्र्यांनी ही रुग्णालयांना तयारीत राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान, हा अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही. तसेच या अपघातात किती जीवीत हानी झाली हे देखील समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आल्या असून जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.