PAK : कराचीमध्ये घरांवर कोसळलं PIA चं विमान, 9 मुलांसह 107 जणांचा मृत्यू ?, PM मोदींनी व्यक्त केलं दुःख (व्हिडीओ)

लाहोर : पाकिस्तानच्या कराचीमधील रहिवाशी भागात पाकिस्तान इन्टरनॅशनल एअरलाइन्सचे एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात प्रवाशी आणि आठ क्रू मेंबर, 9 मुलांसह 107 जण प्रवास करत होते. झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणीही दुजोरा दिलेला नाही. विमान प्रवास करणार्‍या 107 जणांचे प्राण वाचण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ज्या कॉलनीत विमान कोसळले तेथे अनेक घरे आणि रस्त्यावरील वाहनांना आग लागली.

पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार कराचीच्या जिना इन्टरनॅशनल एयरपोर्टजवळील मॉडल टाऊन परिसराच्याजवळ हे विमान लँडिंगपूर्वी दुर्घटनाग्रस्त झाले. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर कॉलनीमधून धुराचे लोट निघत होते. दुर्घटनेनंतर मदतकार्य आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. PIA प्रवक्ता अब्दुल सत्तार यांनी अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले की, हे विमान लाहोरवरून कराचीला येत होते.

दोन्ही इंजिन झाले निकामी

कराचीत लँड करण्यापूर्वी पीआयए ए-320 विमानाची दोन्ही इंजिन निकामी झाली होती. विमान 15 वर्ष जुने होते. विमानाशी 2.37 वाजता शेवटचा एटीसीशी संपर्क झाला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेनंतर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

घटनास्थळी धुराचे लोटच्या लोट निघत असल्याचे दिसत होते. स्थानिकांच्या मदतीने अ‍ॅम्ब्युलन्स आणि बचाव पथकाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. इन्टर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) च्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, लष्कराचे शिघ्रकृती दल आणि सिंध पाकिस्तान रेंजर्स नागरी प्रशासनासह मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहचले आहे.

याच वर्षी जानेवारीत अफगाणिस्तानच्या पूर्वोत्तर गजनी प्रांतात सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे दिड वाजता सरकारी एयरलाइन्स कंपनी एरियाना अफगाणचे विमान क्रॅश झाले होते. स्थानिक मीडियाने वृत्त दिले होते की, विमानात किमान 80 लोक होते, तर अन्य काही मीडियाच्या रिपोर्टनुसार विमानात 100 प्रवाशी होते, असे म्हटले होते. दरम्यान, झालेल्या दुर्घटनबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like