पाकिस्तान प्लेन क्रॅश : 97 लोकांचा वेदनादायी मृत्यू, सोशल मीडियावर वायरल होतोय व्हिडिओ

कराची : पाकिस्तानमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. लाहोरहून कराचीकडे निघालेल्या पाकिस्तान इन्टरनॅशनल एयरलाइन्समध्ये 99 प्रवासी होते, ज्यापैकी 97 प्रवाशांचा मृत्यू झाला.

ही दुर्घटना कराची एयरपोर्टजवळ झाली. पीके-8303 विमान लाहोरहून येत होते आणि कराचीत उतरणार होते. तेव्हाच अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने लॅन्डींगच्या काही सेकंद आधी विमान कराचीच्या रहिवाशी भागात कोसळले.

घटनेनंतर काही सेकंदातच परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. यानंतर काही सेकंदातच या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरला.