पाकिस्तानच्या विमान अपघातात ‘या’ प्रसिद्ध मॉडेलचा मृत्यू, काकांच्या निधनामुळं कराचीला निघालेली !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पाकिस्तानात कराची विमानतळाच्या दिशेनं निघालेल्या विमानाचा लँडिंगआधीच निवासी भागात कोसळून भीषण अपघात झाला आहे. यानंतर लगेचच विनमानं पेट घेतला. यातील मृतांचा किंवा वाचलेल्यांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. असं सांगितलं जात आहे की, यात 100 प्रवासी होते. या अपघातात पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा आबिद हिचा मृत्यू झाला आहे.

अशी माहिती आहे की, लाहोरकडून कराचीकडे जाणाऱ्या या विमानात झारा आबिदही होती. काकांच निधन झाल्यानं झारा लाहोरवरून निघाली होती. कराची विमानतळाच्या जवळच निवासी भागात हे विमान कोसळलं आहे.

https://www.instagram.com/p/CAXk8iPlB2B/

फॅशन डिझायनर खादीजाह शाहनं ट्विट करत म्हटलं आहे की, फॅशन इंडस्ट्रीनं विमान अपघातात झारा आबिदला गमावलं आहे. ती खूप कष्टाळू होती. तिच्या आत्मयाला शांती लाभो. यानंतर अनेक युजर्सनीही तिला सोशलवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

https://www.instagram.com/p/B_4rLQalEkC/

झारा पारंपरिक पोषाखातील मॉडेलिंगासाठी फेमस होती. झारानं तिच्या इंस्टावर एक हेलिकॉप्टरमध्ये बसलेला फोटो शेअर केला होता. यात तिनं म्हटलं होतं की, फ्लाय हाय इट्स गुड. हीच झाराची शेवटची पोस्ट ठरली.

https://www.instagram.com/p/B-M1W4HFsGQ/

https://www.instagram.com/p/B-KGYG7lzPo/

https://www.instagram.com/p/B7Biv4RFRKN/

https://www.instagram.com/p/B73CNvJlRjG/

https://www.instagram.com/p/B4z0476lpNy/

https://www.instagram.com/p/B-KGYG7lzPo/

https://lokmat.news18.com/news/pakistan-plane-crash-model-zara-abid-dies-who-had-left-lahor-after-uncle-death-mhsy-454834.html