भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचे पाकिस्तानचे नियोजन    

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – पाकिस्तान भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचे नियोजन आखत आहे. असे वृत्त पाकिस्तनाच्या ‘द न्यूज’ या दैनिकाने दिले आहे. भारतावर तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याचे देखील या दैनिकाच्या वृत्तात म्हणले आहे. तर भारताने पाकिस्तानच्या सर्व कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे म्हणले आहे.

बालाकोटमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान चौताळला आहे. त्यामुळे भारतात पाकिस्तान कुरापती करण्याच्या तयारीत आहे. अभिनंदन यांच्या सुटकेनंतर भारत पाकिस्तान संबंध सुधारण्याचा अंदाज होता. मात्र, पाकिस्तान आपली कूटनीती सोडण्याच्या तयारीत नाही. यामुळेच त्यांनी बॉम्ब हल्ला करण्याची कूटनीती आखली आहे. जंग वृत्त समूहाच्या ‘द न्यूज’ ह्या वृत्तपत्राने पाकिस्तान भारतावर क्षेपणास्त्र डागण्याच्या तयारीत आहे असे वृत्त छापले आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवले असून पाकिस्तान कसलीही हालचाल करू लागल्यास त्या हालचालीस पायबंद घालण्याच्या तयारीत भारतीय लष्कर आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीतील नेतृत्वाने देखील या बाबत सर्व खबरदारी घेतली आहे.

ह्याही बातम्या वाचा –

सीमेवर पाकिस्ताने केली सैन्यात वाढ

पुन्हा एकदा जम्मू येथील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला ; 10 जखमी