PAK चे PM इम्रान खान यांची पुन्हा एकदा चेष्टा ! व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल – ’तुम्ही घाबरू नका’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   पाकिस्तान देशाचे पंतप्रधान इम्रान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या बाबतीत नेहमी चर्चेत राहत असतात. मग, पाकिस्तानमधील गरीबीचा मुद्दा असो किंवा भारताबद्दल आरोप प्रत्यारोप असो, त्यांची किरकिरी सुरूच असते. सोशल मीडियावर त्यांची विडंबन करून खिल्ली उडवली आहे. अशा प्रकारचा त्यांचा दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तथापि, यावेळी प्रकरण थोडे वेगळे आहे. एका पाकिस्तानी कलाकाराने इम्रान खानचा एक मजेदार व्हिडिओ बनविला आहे. तो अनेक लोकांना खूप आवडत आहे. तर, जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण काय आहे?

मागील वर्षी कोरोना विषाणूच्या वेळी इम्रान खान यांनी देशवासियांना उद्देशून सांगितं होती की ’तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही’. या वक्तव्यासाठी पाकिस्तानी कलाकार साद अल्वी यांनी रॅप गाणे तयार केले आहे. पाक पंतप्रधानांच्या विधानाने ’आपने सबसे पहिले घबराना नहीं है (तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही) अशा शब्दाने गाणे सुरू होते. या गाण्यावर साद अल्वीने आणखी काही मजेशीर शब्द, वाक्य अ‍ॅड केली आहेत. त्यापैकी वाढती महागाई, औषधांचा खर्च, पाकिस्तानमधील शिक्षणाचा मुद्दा आदी बाबी चव्हाट्यावर आणल्या आहेत.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. साद अल्वीने हे गाणं आपल्या युट्यूब अकाउंटवर सर्वप्रथम शेअर केलं आहे. यानंतर पत्रकार नायला इनायत यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे आणि जोरदार कमेंट्सही दिल्या जात आहेत. या व्हिडिओमुळे आता पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनाच म्हणायची वेळ आली आहे की, ’आपने सबसे पहिले घबराना नहीं है (तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही).