पाकिस्तानने कर्ज फेडण्यासाठी केला म्‍हशींचा लिलाव

इस्लामाबाद :

नव्याने स्‍थापन झालेले पाकिस्‍तानचे  इम्रान खान सरकार चांगलेच आर्थिक गर्तेत सापडले आहे. या आर्थिक संकटातून  बाहेर पडण्यासाठी पाकिस्‍तान सरकारला कार तसेच म्हशींचाही लिलाव करण्याची नामुष्की ओढवली आहे. इम्रानखान सरकारने आपल्‍या ताफ्यातील ७० लग्‍जरी कारचा लिलाव केला आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे कारसोबतच आठ म्‍हशींचाही लिलाव करण्यात आला आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी खर्चकपातीच्या विविध योजनांची घोषणा केली होती. या घोषणांची  प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सरकारने सुरुवात केली आहे.

सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली  तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान निवासस्थानी ८ म्हशी पाळल्या होत्या. पंतप्रधान असताना ते या म्‍हशींच्या उत्‍पन्नातून आपला घर खर्च भागवत होते. मात्र,इम्रान सरकारने आता याच म्‍हशींचा लिलाव केला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पहिल्‍या टप्यात ७० लग्‍जरी कार, ४ मर्सिडीज बेंझच्या  कार, ८ बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू, ३ पाच हजार सीसीच्या एसयूव्ही कार, २ तीन हजार सीसी एसयूव्ही कार, तसेच २०१६ च्या २४ मर्सिडीज बेंझ कार्सचा लिलाव करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात ४० टोयोटा कार, लेक्सस एसयूव्ही आणि दोन लँड क्रूझरचा लिलाव होणार आहे. हे पंतप्रधान इम्रान खान यांच्या  वित्तव्यवस्था मोहिमेच्या अंतर्गत केले जात आहे.

पाकिस्‍तानवर सध्या ३० अब्‍ज रूपये कर्ज असून, हे कर्ज वाढत राहिले तर पाकिस्‍तानची अवस्‍था बिकट होईल. परिस्थिती सुधारली नाही तर देश दिवाळखोरीत निघेल. या बिकट परिस्‍थितीतून बाहेर येण्यासाठी इम्रान खान सरकारने खर्चकपातीच्या विविध योजना जाहीर केल्या होत्या. त्यात निधी उभारण्यासाठी सरकारी मालमत्तेचा वापर करण्यावर भर होता. त्‍यानुसार इम्रान सरकार आता या घोषणांची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी करत आहे.

[amazon_link asins=’B019XSHB7O,B06Y5P68KC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2c2f54ed-bb2a-11e8-b2e0-bb759189f6cb’]