पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या 3 पत्नी आणि मुलांबद्दल तुम्हाला माहिती आहे ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इम्रान खान हे पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान आहेत. इम्रान यांची क्रिकेटची कारकीर्द असो वा राजकीय कारकीर्द इम्रान नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत आज त्यांचा 67 वा जन्मदिवस. या खास दिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत इम्रान खान यांच्याबाबतच्या काही खास गोष्टी.

5 ऑक्टोबर 1952 रोजी इम्रान खान यांचा जन्म पंजाबमधील मियावाली येथे झाला. त्यांचे वडील लाहोरमध्ये एक सिव्हील इंजिनिअर म्हणून काम करत होते तर त्यांची आई गृहिणी होती. इम्रान खान क्रिकेटपेक्षा आणि राजकारणापेक्षा त्यांच्या लग्नामुळेच जास्त चर्चेत होते. त्यांनी एकूण तीन विवाह केले.

इम्रान खान यांचा पहिला विवाह
1995 मध्ये इम्रान खान यांनी वयाच्या 42 व्या वर्षी 21 वर्षाच्या जेमिमा गोल्डस्मिथ सोबत लग्न केले. जेमिमा एका ब्रिटिश कोट्याधीशाची मुलगी आहे आणि एक फिल्म प्रोड्युसर आहे. सुलेमान इशा खान आणि कासिब खान ही दोन मुले देखील त्यांना आहेत.

इस देश में रहते हैं पाक PM इमरान खान के बेटे, इतना बड़ा है परिवार

इम्रान खान यांचा दुसरा विवाह
2004 मध्ये गोल्डस्मिथ सोबत घटस्फोट झाल्यानंतर 2015 मध्ये ब्रिटिश – पाकिस्तानी जर्नलिस्ट रेहम खानशी लग्न केले. त्यावेळी इम्रान यांचे वय 63 होते. मात्र हा विवाह केवळ दहा महिनेच टिकला त्यानंतर त्यांनी घटस्पोट घेतला.

इस देश में रहते हैं पाक PM इमरान खान के बेटे, इतना बड़ा है परिवार

इम्रान खान यांचा तिसरा विवाह
इम्रान खान यांनी वयाच्या 65 व्या वर्षी फेब्रुवारी 2018 मध्ये 40 वर्षांच्या बुशरा मनेका यांच्याशी तिसरे लग्न केले. यावेळी दुसऱ्या पत्नीने इम्रान यांच्यावर अनैतिक संबंध ठेवल्याचे आरोप केले होते.

इस देश में रहते हैं पाक PM इमरान खान के बेटे, इतना बड़ा है परिवार

कोण आहे नेमकी तिसरी पत्नी
इम्रान खान हे धार्मिक कारणांमुळे अनेक वर्षांपासून बुशरा यांच्याकडे जात होते. बुशरा यांचे यापूर्वी देखील लग्न झालेले आहे आणि त्यांना पाच मूल देखील आहेत. बुशरा या खूप धार्मिक आहेत. इम्रान खान यांनी आपल्या तिसऱ्या पत्नीला न पाहताच प्रपोज केला होता. त्यांनी सांगितले की बुशरा या पती व्यक्तिरिक्त अजून कोणालाही भेटताना पडद्याचा वापर करत असे. बुशरा ही इम्रान खान यांची बरेच वर्ष धार्मिक गुरु देखील राहिलेली आहे. सध्या इम्रान खान यांची तिसरी पत्नी यामुळे देखील चर्चेत आहे की आरशामध्ये तिचे प्रतिबिब दिसत नाही.

इम्रान खान यांची मुले काय करतात
सुलेमान इशा खान आणि कासिब खान ही दोनीही मुले ब्रिटनमध्ये त्यांच्या आईसोबत राहतात. यातील सुलेमान खान लवकरच ब्रिटनच्या राजकारणात सक्रिय होणार आहे. यासाठी तो आपल्या वडिलांचे नाही तर आईचे मार्गदर्शन घेत आहे.

Visit : Policenama.com