PM इम्रान खान यांच्या ‘सलवार-कमीज’वरून पाकिस्तानमध्ये ‘हंगाम’, पत्नीने केला खुलासा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा अमेरिका दौरा संपला असूनही हा दौरा काहीना काही कारणांनी चर्चेत आहे. इम्रान खान पाकिस्तानला परतल्यानंतर आता अमेरिकेतील त्यांच्या पेहरावावरून वाद सुरु झाला आहे.

पाकिस्तानच्या माध्यमांनी सांगितल्यानुसार पाकिस्तानमधील सर्वात महागडे डिजाइनर स्टोर ‘मोहतरम’ ने दावा केला आहे, की अमेरिकेत इम्रान खान यांनी परिधान केलेले कपडे त्यांच्याकडून बनवून घेण्यात आले आहेत. मोहतरम स्टोरने सांगितले की त्यांनी इम्रान खान यांच्यासाठी एकूण ७ सलवार कमीज बनवले होते. या डिझाइनरच्या सलवार कमीज अधीक महागडे असून तेथील जॅकेटची किंमत वेगळी घेतली जाते.

विशेष म्हणजे इम्रान खान यांचे विशेष सहायक सैयद बुखारी यांनी सांगितले, की इम्रान खान यांचे कपडे त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनी स्वतः कपडा खरेदी करून शिवून घेतले आहेत. तसंच हे सर्व त्यांनी कमी पैशात केले आहे.

मोहतरम डिझाइनर स्टोरने केलेल्या दाव्यावर त्यांच्या पत्नीने खुलासा केला. त्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. इम्रान खान यांनी अमेरिका दौऱ्यावर राष्ट्राध्यक्ष आणि इतर अधिकाऱ्यांना भेटताना पाकिस्तानचे परंपरागत सलावार कमीज हे कपडे परिधान केले होते. ते एकाच पोशाखात वेगवेगळ्या रंगात दिसत होते.

या दौऱ्यादरम्यान इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यात त्यांनी पाकिस्तानच्या अर्थववस्थेवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी चर्चा केल्याचे सांगितलं. या सोबत अनेक विषयांवरही त्यांनी यावेळी चर्चा केली.

आरोग्यविषयक वृत्त