PAK : PM इम्रान खानच्या ड्रायव्हरने सौदी अरेबियातील एका श्रीमंत महिला व्यावसायिकाशी केले लग्न !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानच्या ड्रायव्हरने सौदी अरेबियातील श्रीमंत अरब महिला व्यावसायिकाशी लग्न केले आहे. असा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ट्वीट केलेल्या व्हिडिओवर लग्नाच्या बाजूने व विरोधात प्रतिक्रियां पाहायला मिळत आहेत. एकीकडे लोक याला प्रेमाचे उदाहरण म्हणून सांगत आहेत. दुसरीकडे या व्हिडिओवर असाही दावा केला जात आहे की, ही अरबमधील कोणत्यातरी लग्नाची क्लिप आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की, हा व्हिडिओ बनावट संदेशासह सामायिक केला जात आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधण्यास सुरवात केली आहे.

महिला सौदीची सर्वात श्रीमंत व्यावसायिका
व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, ही महिला सौदीची सर्वात श्रीमंत व्यावसायिका साहू बिंट अब्दुल्लाह अल महबूब आहे. साहूकडे मक्का आणि मदिना, तसेच फ्रान्स आणि इतर देशांत हॉटेल्ससोबत अनेक संपत्तीचा समावेश आहे. त्यांची एकूण मालमत्ता 8 अब्ज डॉलर्स असल्याची सांगितली जात आहे. व्हिडिओमध्ये, ज्या व्यक्तीशी ती लग्न करताना दिसत आहे, तो तिचा पाकिस्तानी वंशाचा ड्रायव्हर असल्याचे म्हंटले जात आहे. दरम्यान, ही घटना खरी आहे की नाही याबद्दल स्पष्ट मत नाही. त्याचबरोबर बर्‍याच वेबसाइटवर असाही दावा केला गेला आहे की हा व्हिडिओ प्रत्यक्षात दोन अरबी नागरिकांच्या लग्नाचा आहे आणि त्यात दिसणारी महिला सौदीची श्रीमंत व्यावसायिका नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानवर केली जातेय टीका
हा व्हिडिओ उघड झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. दरम्यान, इम्रान खानचा एक जुना फोटो शेअर केला जात आहे, ज्यात तो सौदी प्रिन्ससाठी ड्रायव्हिंग करताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील बिघडत चाललेल्या संबंधांची चिंता करत आहेत. अलीकडेच सौदी अरेबियाने पाकिस्तानला आणखी कर्ज देण्यास नकार दिला आणि आधी घेतलेले कर्ज परत करण्यासही सांगितले. त्यानंतर कोट्यवधी डॉलर्सचे कर्ज फेडण्यासंदर्भात इम्रान सरकार दबावात आले आहे.

सौदी अरेबियाने पाकिस्तानला आर्थिक मदत पॅकेज अंतर्गत 3 वर्षांसाठी 6.2 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते आणि त्यामध्ये 3 अब्ज डॉलर्सची रोकड सहाय्य समाविष्ट आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानला 3.2 अब्ज डॉलर्स तेल आणि गॅस पुरवणार होते. परंतु, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काश्मीरच्या मुद्यावर सौदी अरेबियाला हस्तक्षेप करण्यास आणि नंतर चिथावणीखोर विधानामुळे 2021 मध्ये संपणारे हे पॅकेज 2020 मध्येच बंद करण्यात आले. इतकेच नाही तर यानंतर सौदीने पाकिस्तानला कर्ज परत करण्यास सांगितले. आता पाकिस्तान चीनच्या मदतीने हे कर्ज परत करत आहे.