आता भारतासोबत बोलून काही फायदा होणार नाही, PM इम्रान खाननं दिली युध्दाची ‘धमकी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने काश्मीरचा विशेष दर्जा संपवून टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर पाकचे पंतप्रधान वारंवार भडकावू वक्तव्य करत आहे. बुधवारी ते असे बोलले की, आता पुन्हा भारतासोबत बोलणी करण्याचे ते आवाहन करणार नाहीत. तसेच खान म्हणाले की, दोन शेजारी अण्वस्त्र संपन्न देशांमधील सैनिकी संघर्षाचा धोका आता वाढतच चालला आहे आणि सैन्य संघर्ष हा अटळच आहे. विदेशी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानी पंतप्रधानांनी तक्रार केली की, त्यांनी भारताला वारंवार चर्चेसाठी विनंती केली होती. पण भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याकडे दुर्लक्षच केले.

न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले कि, आम्ही भारतासोबत बोलणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने मी जेव्हा आता मागे वळून पाहतो तेव्हा असे दिसते की, भारताने शांतता आणि संभाषणासाठी केलेल्या आमच्या सर्व प्रयत्नांचा उपयोग शांतता निर्माण करण्याऐवजी तुष्टीकरणासाठीच केला. इम्रान पुढे म्हणाले, आता भारतीय अधिकाऱ्यांशी बोलण्याचे काहीही औचित्य राहिले नाही. तसेच आतापर्यंत केलेले सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरले आहेत. खान म्हणाले, आता आम्ही यापेक्षा आणखी दुसरे काहीही करू शकत नाही.

पठाणकोटच्या हल्ल्यानंतर भारताने अशी भूमिका घेतली होती कि, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करणार नाही तोपर्यंत भारत कसल्याही प्रकारची पाकसोबत बोलणी करणार नाही. मात्र त्यावेळेस इम्रान यांनी बोलणी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

तसेच खान म्हणाले, भारत काश्मीर मध्ये बनावट कारवाया करू शकतो जेणेकरून पाकिस्तानविरूद्ध लष्करी कारवाया करण्यासाठी आधार मिळू शकेल. अशा स्थितीत पाकिस्तानलाही प्रतिउत्तर देणे भाग पडेल. दोन अण्वस्त्रधारी देश एकमेकांसमोर असताना काहीही होऊ शकते. मला या गोष्टीची काळजी वाटते कि, काश्मीर मध्ये परिस्थिती आणखी गंभीर होईल. दोन्ही शेजारी देश अण्वस्त्र संपन्न असल्या कारणाने जगाने हे लक्षात घेतले पाहिजे कि, आम्ही सध्या कोणत्या परिस्थितीतून जात असू.

इम्रान खान यांच्या टीकेला उत्तर देताना भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी खान यांचे म्हणणे पूर्णपणे नाकारले. तसेच न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना ते म्हणाले की, “आमचा पूर्व अनुभव आहे की, आम्ही जेव्हा -जेव्हा शांततेकडे पाऊल टाकले तेव्हा-तेव्हा ते आमच्यासाठी वाईटच ठरले आहे. पाकिस्तानकडून आम्ही दहशतवादाविरूद्ध ठोस आणि विश्वासार्ह कारवाई करण्याची आम्ही अपेक्षा करतो.”

पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळत राजदूत पुढे म्हणाले की, काश्मीरमधील जन-जीवन आता सामान्य होत चालले आहे. चालू परिस्थिती पाहता काश्मीर मध्ये लावले गेलेले निर्बंध आता कमी करण्यात येत आहेत. शाळा, बँका आणि रुग्णालये सुरु झालेले आहेत. राज्यात आवश्यक तेवढे अन्न भांडारात उपलब्ध आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिथे केवळ संचार माध्यमांवर काही प्रमाणात बंधने लागू आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like