दिल्ली हिंसाचाराबाबत PAK चे PM इम्रान खानची ‘टिवटिव’, म्हणाले – परिणाम ‘गंभीर’ होतील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांनी बुधवारी पुन्हा एकदा दिल्लीतील हिंसाचाराबद्दल मोदी सरकार आणि आरएसएसवर हल्ला चढविला. इमरान खान म्हणाले की, आज भारत अतिशय धोकादायक मार्गावर असून तेथून परत येणे फार अवघड आहे.

इमरान खान म्हणाले, इतिहास दर्शवितो की भारतात ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फासीवादी आणि वांशिक विचारधारा अवलंबली गेली आहे, त्यातून केवळ रक्तपातच होईल. ते म्हणाले, भारतात हिंदुत्ववादी विचारधारा मुस्लिम व ख्रिश्चनांविरूद्ध द्वेष पसरवित आहे आणि त्याचे पुढचे लक्ष्य देशातील अन्य अल्पसंख्याक समुदाय असतील.

आंतरराष्ट्रीय समुदायाला कारवाईचे आवाहन करत इमरान खान म्हणाले की, मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदायाला दुर्लक्षित कल्याचे गंभीर परिणाम होतील. भारत आता पूर्णपणे यामध्ये अडकला आहे.

इमरान खान म्हणाले की, भारतीय मीडियाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे कौतुक केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली परंतु यावरून हे सिद्ध होते की भारताच्या आंतरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानची सध्याची प्रतिमा काय आहे. अर्थव्यवस्थेच्या निकृष्ट स्थितीबद्दल ते म्हणाले की, आता कठीण वेळ निघून गेली आहे, आता परिस्थिती सुधारेल.

इमरान खान म्हणाले, मला असे वाटते की आंतरराष्ट्रीय समुदाय हस्तक्षेप करेपर्यंत भारत अशा रस्त्याने जाईल की तो मार्ग भारतासाठी आत्मघातकी ठरेल. कारण जेव्हा वांशिक आणि धार्मिक श्रेष्ठत्वावर आधारित विचारधारा ही अब्जावधी लोकसंख्या असणाऱ्या आणि अणुऊर्जा समृद्ध देशावर नियंत्रण ठेवते. तेव्हा त्याचे परिणाम भोगावे लागतील.

इमरान खान यांनी सांगितले की त्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतरच जागतिक नेत्यांना हिंदुत्ववादी विचारसरणीचे परिणाम सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने ते कोणालाही समजले नाहीत. यानंतर भारताने नागरिकत्व कायदा आणि एनआरसी आणण्याचा निर्णय घेतला. ही प्रत्येक गोष्ट अशी होती की जे आधुनिक जगात घडायला नको होते. यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होत असते.

इमरान खान म्हणाले, आंतरराष्ट्रीय समुदायाला मी आवाहन करतो की कारवाई करण्याची वेळ आता आली आहे. जर आत्ता जगाने कारवाई केली नाही तर परिस्थिती आणखी वाईट होईल.

दिल्ली मध्ये झालेल्या हिंसाचारावर इमरान खान यांनी सांगितले की, आम्ही दिल्लीत जे काही पाहिले, ती फक्त एक सुरुवात आहे. मला हे माहित नाही की ये सर्व कसे थांबेल.