मला शांततेचा नोबेल नको ; माझ्यापेक्षा ‘त्यांना’ द्या : इम्रान खान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यावर पुढाकार घेत अभिनंदन यांना भारताला सोपव्याची घोषणा पाकच्या संसदेत केली होती. त्यांनतर पाकिस्तानने इम्रान खान यांना शांततेचा नोबेल द्यावा अशी मागणी केली होती. त्यावर इम्रान खान यांनी आपली भूमिका मांडली आहे.

नोबेल शांतता पुरस्कार माझ्यासाठी उपयोगी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. शांती आणि मानवतेसोबत काश्मीरचा ज्वलंत मुद्दा सोडवण्यासाठी जे प्रयत्न करत आहे. जी व्यक्ती प्रश्न सोडवेल, त्या व्यक्तीला शांततेचा पुरस्कार द्या, अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली आहे. त्यांनी तसं ट्वीट केले आहे.

दरम्यान, भारताने पाकिस्तानचे हवाई हल्ले पळवून लावले. त्यावेळी भारताचे पायलट विंग कमांडर पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले होते. पाकिस्तानने अभिनंदन यांना सोडावे यासाठी भारताने पाकिस्तानवर सर्वोतोपरी दबाव घातला. त्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांची बिनशर्त सुटका करण्याची घोषणा केली होती.