‘तू तर आम्हाला भिकारी…’, पाकिस्तानच्या कवीने काढली इम्रान खानची ‘इज्जत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये सध्या सोशल मोडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या व्हिडिओत पाकिस्तानमधील प्रसिद्ध कवी फरहत अब्बास शाह यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीवरील चर्चेत इम्रान खान यांच्यावर हि टीका केली आहे. इम्रानच्या कार्यकाळात देशात झालेल्या बदलांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, पंतप्रधान इम्रान खान पंतप्रधान म्हणून सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहेत. देशात सध्या पूर्वीपेक्षा जास्त भयानक स्थिती झाली असून यासाठी इम्रान खान जबाबदार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. पुढे कवितेतून ते म्हणाले कि, तुमच्या कारभाराने आम्हाला भिकारी बनवले असून तुम्ही सत्तेवर राहण्याच्या लायकीचे नाहीत. तुम्ही कशाला आलात ? तुमच्या कार्यकाळात प्रत्येक नागरिक गरिबी, भ्रष्टाचार आणि अन्यायाचा सामना करत आहे. इम्रान खान यांनी गरिबी आणि भ्रष्टाचार हटवण्याचा वादा केला होता, मात्र नागरिकांना भीक मागण्यासाठी मजबूर केले आहे. त्याचबरोबर इम्रान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या प्रमाणात डबघाईला आली आहे. अनेक देशांकडून आणि संस्थांकडून कर्ज घेऊन देखील पाकिस्तान या संकटातून वर आलेला नाही. मागील 30 वर्षात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेनं पाकिस्तानला 13 वेळा कर्ज दिले आहे.

आरोग्यविषयक वृत्त