कोठून शोधून आणता असे पत्रकार ? PAK पत्रकाराला उत्तर देण्याऐवजी ट्रम्प यांनी इम्रान खानला विचारला प्रश्‍न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतेच डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंप्रधान इम्रान खान हे एका भेटीदरम्यान एकत्र आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या समोर नरेंद्र मोदी यांची खूप स्तुती केली. ते म्हणाले मोदी यांनी हाउडी मोदी या कार्यक्रमातील कलम 370 बाबतचे भाषण खूपच आक्रमक होते. जमलेले सर्व लोक त्यांना अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. इम्रान खान यांच्या भेटीदरम्यान ट्रम्प हे एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर चांगलेच भडकले त्यामुळे त्यांनी इम्रान खान यांना प्रतिप्रश्न केला.

झाले असे की या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारले की काश्मीरातील मानवाधिकार कायद्याच्या उल्लंघनाबाबत आपल्याला काय वाटते त्यावर ट्रम्प यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवत इम्रान खान यांना विचारले ‘असे पत्रकार तुम्ही कोठून शोधून आणता’ ? इम्रान खान यांना वस्तुस्थिती पटवून देण्यासाठी ट्रम्प म्हणाले मला पाकिस्तानवर विश्वास आहे परंतु हे पुढे बसलेले लोक पाकिस्तानवर विश्वास ठेवत नाही.

ट्रम्प म्हणाले की, भारताचे आणि आमचे चांगले संबंध आहेत तसे त्यांनी यावेळी विश्वास देखील व्यक्त केला की भारत पाकिस्तान एकत्र येऊ शकतात. तसेच त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की जर दोन देश एकत्र येण्यासाठी तयार असतील तर अमेरिका मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे. इम्रान खान यांनी या आधी भारत चर्चेला तयार नसल्याची तक्रार ट्रम्प यांच्याकडे केली होती.

Visit : policenama.com