पाकिस्तान कंगाल ! PM इम्रान खानांना सचिवालयाचं लाईट बील भरण्यास ‘अडचणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दारिद्र्य आणि बदनामीने त्रस्त असलेला पाकिस्तान जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारताला अण्वस्त्र युद्धाची पोकळ धमकी देत आहे, पण प्रत्यक्षात देशांतर्गत आघाडीवर त्याची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, वीज बिल भरण्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधान सचिवालयाकडे पैसे नाहीत. दिवाळखोरीच्या मार्गावर असणार्‍या पाकिस्तानची आर्थिक दुर्दशा अत्यंत गंभीर बनली आहे आणि यामुळे बिलांचा भरणा न झाल्याने पाकिस्तानी पंतप्रधान सचिवालयाची वीज खंडित होण्यापर्यंत दुर्दैवी वेळ पाकिस्तानवर आली आहे.

काश्मिरच्या विषयावरून भारताबरोबर ‘अंतिम युद्धाची’ धमकी देण्यात व्यस्त असलेल्या पाकिस्तान सरकारकला स्वतःच्या देशातील परिस्थितीबद्दल मात्र जराही काळजी दिसत नाही. त्यांच्याकडे स्वतःचे सचिवालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नसतात. या कारणास्तव, इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीला पंतप्रधान सचिवालयात एक संबंधिताची नोटीस पाठविणे भाग पडले आहे.

‘एक्स्प्रेस न्यूज’ च्या अहवालानुसार पंतप्रधान सचिवालयाचे इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीकडे ४१ लाख १३ हजार ९९२ रुपयांचे बिल आहे. मागील महिन्याचे बिल ३५ लाखाहून अधिक आहे, तर आधीचे थकित पाच लाख ५८ हजार इतके आहे. कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान सचिवालयाद्वारे वीज बिल नियमितपणे भरले जात नाही. कधीकधी बिलाचे पैसे जमा केले जातात आणि काही महिने मात्र ते जमा केले जात नाहीत. या कारणास्तव, त्यावर थकबाकी आहे, ती जमा केली नाही तर वीज तोडली जाईल.

दरम्यान कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारतीय मालावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे भारतीय मालाच्या किमती पाकिस्तानमध्ये प्रचंड वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानला जागतिक स्तरावरून मिळणारी सर्व प्रकारची मदत बंद झाल्याने आर्थिक स्थिती ढासळली आहे. यामुळे पाकिस्तानची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –