भारत ‘POK’ ताब्यात घेण्याच्या भीतीनं ‘पाक’ची ‘घाबरगुंडी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांना मंगळवारी काश्मीर प्रश्नावर पाक पंतप्रधान इमरान खान निष्क्रिय ठरल्याचे वक्तव्य केले. बिलावल म्हणाले, पहिल्यांदा आपण भारताकडून श्रीनगर हिसकावून घेण्याची भाषा करत होतो, परंतू आता आपल्याला मुजफ्फराबाद वाचवता वाचवता नाकात दम आला आहे. आता पाकिस्तानमधूनच इमरान खान यांच्यावर टीका सुरु झाली आहे.

यावेळी बिलावल यांनी इमरान खान यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, इमरान खान इलेक्टेड नाही तर सिलेक्टेड पीएम आहेत. सिलेक्टरकडे आणि सिलेक्टर्सकडे आता जनता उत्तर मागत आहे. पाकिस्तानला आता पाकव्याप्त काश्मीर जाण्याची देखील भीती वाटायला लागली आहे.

इस्लामाबादमध्ये पक्षाच्या बैठकीत ते म्हणाले की, आता देशासमोर हे स्पष्ट झाले आहे की इमरान खान सरकार निष्क्रिय सरकार आहे. आपले लोकशाहीबरोबर जे काही केले ते तर आपण पाहिले, आपली अर्थव्यवस्था बरबाद केली. आपण तेही सहन केले.

इमरान खान यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, तुम्ही झोपेत होते आणि मोदींनी काश्मीर हिसकावून घेतले. पहिल्यांदा आपले काश्मीर धोरण काय होते? आपण नियोजन करत होतो की श्रीनगर भारताकडून कसे हिसकावून घेता येईल? आता विचार करावा लागतो की मुजफ्फराबादचे काय होणार?

भारताने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तान यानंतर भारताविरोधात कुरापती करत आहे. तसेच काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक देशांना काश्मीर मुद्दा पाकच्या बाजूने मांडवा यासाठी विनावण्या करत आहे. परंतू कोणताही देश अजून पुढे आलेला नाही. तर भारताला अनेक देशांनी समर्थन दिले आहे. कालच जी ७ परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की काश्मीर मुद्दा भारत आणि पाकिस्तानमधील अंतर्गत मुद्दा आहे. तो त्यांनी आपापसात सोडवावा.

आरोग्यविषयक वृत्त –