पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन , दोन्ही देशातील व्यवहार बंद  

पुंछ : वृत्तसंस्था – पाकिस्तानने पुन्हा एकदा पुंछ परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे, भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा व्यापार बंद करण्यात आला आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ च्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता.त्यावेळी भारतीय वायू दलाने एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानमध्ये घुसून त्या दहशत वादी हल्ल्याचे प्रत्युत्तर दिले . त्यादिवशी पासून पाकिस्तान कडून बऱ्याच वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यांनी जेंव्हा-जेंव्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले तेंव्हा-तेंव्हा भारतीय सैनिकांनी सडेतोड उतार दिले. याच दरम्यान जम्मू-काश्मीरमधील पुंछ, राजौरीसह नियंत्रण रेषेजवळील सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. इतकेच नव्हे तर परिसरात मोठ्या प्रमाणात गोळीबारही करण्यात आला. या गोळीबारात भारताचा एक जवान शहिद झाला आहे.

विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या या नापाक हरकतीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच या गोळीबारामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात होणारा व्यापार बंद करण्यात आला आहे. याआधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मधील व्यापार बंद करणात आला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us