PM मोदींना ‘Snake Attack’ची धमकी देणार्‍या PAK च्या ‘पॉप’ गायिकेला ‘बुरे दिन’, होऊ शकते जेल (व्हिडीओ)

लाहोर : वृत्तसंस्था – भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींना धमकावणारी पाकिस्तानी पॉप गायक रबी पिरजादा चे वाईट दिवस सुरु झाल्याचे दिसत आहे. एका प्रकरणामुळे ती चांगलीच अडचणीत सापडली असून तिला आता तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. लाहोरमधील ब्युटी सलूनमध्ये विदेशी जनावरांना पाळीव प्राणी म्हणून ठेवल्याबद्दल या पाकिस्तानी पॉप स्टारविरूद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या वन्यजीव संरक्षण व फलोत्पादन विभागाने रबी पिरजादाच्या ब्युटी सलूनमध्ये विदेशी जनावरे ठेवण्याबद्दल कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. वन्यजीव कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल वन्यजीव संरक्षण विभागाने लाहोरच्या स्थानिक न्यायालयात रबी पीरजादाविरूद्धचे एक दावा दाखल केला आहे.

दरम्यान जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटविण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर चिडून रबी पिरजादा यांनी भारताचे पंतप्रधान मोदींना अजगराबरोबर अनेक सापांसह व्हिडिओ बनवून धमकावले होते. तिने म्हटले होते, “मी, एक काश्मिरी महिला, भारताविरोधात लढायला सापांसह तयार आहे ‘ही भेट खरेतर मोदींसाठी आहे.’ ”

रबी पिरजादाने आपल्या आणखी एका सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती अजगर आणि मगरीसोबत दिसली होती. ती म्हणत होती- ‘मी, एक काश्मिरी महिला आपल्या सापांसह सज्ज आहे. हे सर्व नरेंद्र मोदींसाठी आहेत. तुम्ही काश्मिरींना त्रास देत आहात, म्हणून आता नरकात मरायला तयार व्हा. माझ्या सर्व मित्रांना शांतता हवी आहे.’

रबी हा पाकिस्तानातली एक पॉप गायक आहे आणि तिने बरेच टेलिव्हिजन शो होस्टही केले आहेत. २०१७ साली तिने बॉलिवूड इंडस्ट्री आणि सलमानला विरोध केल्यानंतर तिचे नाव चर्चेत आले होते. त्यानंतर काश्मीर वादावर तिने गायलेल्या गाण्यामुळे देखील रबी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती.