मोठा खुलासा ! जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्यासाठी PAK नं तयार केल्या नवीन 2 दहशतवादी संघटना

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय सुरक्षा एजन्सींच्या अहवालात खुलासा झाला आहे की पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ ने जम्मू-काश्मीरमध्ये दोन नवीन दहशतवादी गट तयार केले आहेत, जेणेकरून ते भारतात मोठा दहशतवादी हल्ला करू शकतील. एका वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार या दोन दहशतवादी गटांना दि रेझिस्टन्स फ्रंट (The Resistance Front) आणि तहरीक ए मिल्लत इस्लामी (Tehreek-i-Milat-i-Islami) असे नाव देण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या मदतीने तयार केलेला ‘The Resistance Front’ (TRF) ज्याचे दुसरे नाव जेके फाइटर्स देखील आहे, तो गेल्या दोन महिन्यांपासून कार्यरत आहे, तर Tehreek-i-Milat-i-Islami (TMI) च्या संदर्भात सुरक्षा एजन्सी अधिक माहिती गोळा करण्यात गुंतल्या आहेत.

तहरीक ए मिल्लत इस्लामिक कमांडर नईम फिरदौस याने एक ऑडिओ मेसेज जारी करून सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा एजन्सींवर हल्ले करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर टीआरएफ कमांडर अबू अनस हा ऑडिओ मेसेजद्वारे भारताच्या मुस्लिमांना भडकावण्याचा कट रचत आहे. अबू अनस याने काश्मिरी नेते अल्ताफ बुखारी यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. दोन्ही दहशतवादी गट सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत.

सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, दहशतवादी संघटना पाकच्या इशाऱ्याने काश्मिरी लोकांना दहशतवादी संघटनेत सामील करून सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या कटाचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून हल्ल्यानंतर कोणीही पाकिस्तानवर बोट उचलू शकणार नाही. सुरक्षा एजन्सीशी संबंधित एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नियंत्रण रेषेजवळ लॉन्चिंग पॅडवर सुमारे 450 दहशतवादी आहेत, जे काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लॉन्चिंग पॅडवर जमा झालेल्या या दहशतवाद्यांच्या गटात पाकिस्तानी वंशाचे सुमारे 350 दहशतवादी आहेत.

मार्च महिन्यात जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोपोर येथून 4 दहशतवाद्यांना अटक केली तेव्हा ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेचे नाव समोर आले. या सर्वांनी चौकशीत सांगितले होते की ते लष्कर, द रेझिस्टन्स फ्रंट या नव्या गटाशी संबंधित आहेत आणि ते टेलीग्रामवरील अ‍ॅन्ड्र्यू जोन्स नावाच्या कमांडरशी संपर्कात आहेत. या सर्वांच्या मते अँड्र्यू जोन्स व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर खान बिलालच्या नावाने सक्रिय आहे. चौकशीदरम्यान प्रत्येकाने खुलासा केला होता की त्यांना सीमापार कडून सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांनी अधिकाधिक अधिकाऱ्यांना नवीन गटात सामील करून घ्यावे आणि त्यांच्यामार्फत दहशतवादी हल्ले करावेत.