PoK मध्ये युध्दाची हत्यारं जमा करतोय पाकिस्तान, सीमेवरील सैन्य दलाचा ‘वॉच’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला. यानंतर या मुद्द्यावर समर्थन मागणाऱ्या पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला असून सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पाठिंबा देणारा चीनदेखील तोंडघशी पडला.

UNSC मध्ये झालेल्या या बैठकीत पाकिस्तान आणि चीनने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून देखील काश्मीरविषयी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला. त्याचबरोबर पाकिस्तान विविध राष्ट्रांकडे याप्रकरणी मदत मागत असून सध्या पाकिस्तान एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

याचबरोबर पाकिस्तान दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धाची तयारी करत असून त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले असून युद्धसाहित्य देखील मोठ्या प्रमाणावर आणून ठेवले आहे. सीमारेषेवर लष्कराच्या अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले असून 6 ब्रिगेड तयार करण्यात आल्या आहेत. माहितीनुसार पाकिस्तान याठिकाणी भारताविरुद्ध छोट्या युद्धाची तयारी करत असून यासाठी सामान गोळा करून ठेवत आहे. या ठिकाणी सीमेवर प्रत्येक ठिकाणी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. दाना सेक्टरमध्ये सर्व युद्ध साहित्याची जमवाजमव करण्यात आली असून परिस्थितीवरून युद्ध होण्याच्या मार्गावर आहे.

कधी सुरु होईल युद्ध

एका रिपोर्टनुसार, या सर्व हालचाली पाहून सप्टेंबर किंवा ऑकटोबर महिन्यात या घडामोडी घडू शकतात. त्यानंतर बर्फ पडण्यास सुरुवात होणार असून युद्ध करणे अशक्य होणार आहे. पाकिस्तानी सेनेच्या माहितीनुसार भारत त्यांना झेलम नदीच्या पलीकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. जर असे झाले तर आम्ही देखील प्रत्युत्तरास तयार आहोत. पाकिस्तान सैन्याचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे कि, भारतीय लष्कराच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून भारतीय सैन्याने कोणताही हल्ला केल्यास तो परतवून लावण्यास आम्ही सक्षम आहोत. त्याचबरोबर नुकत्याच हाती आलेल्या सॅटेलाईट फोटोंनुसार देखील पाकिस्तान याची मोठी तयारी करत असून कराची, ओरमारा आणि ग्वादर बंदर त्यांनी पूर्णपणे खाली केले आहे.

चीनच्या मदतीने बनवत आहेत बोगदा

भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने या युद्धाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरु केली असून चीनच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानसेहरा मध्ये मोठा बोगदा तयार केला जात आहे. त्याचबरोबर पाकिस्तान विविध युक्त्या वापरून दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करून देण्याचा प्रयत्न करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या