Coronavirus : पाकिस्तानमधील ‘कोरोना’ग्रस्त वाढल्यानं इमरान सरकार ‘सैरभैर’, मदतीसाठी चीनपुढं पसरले हात

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये डिसेंबर मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मात्र आता जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनोचा संसर्ग झाला आहे. आता पर्यंत दीड लाखांच्या वरती लोकांना याचा संसर्ग झाला असून ७००० च्या वरती लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा कोरोनाने दहशद माजवली अजून या संकटापासून बचाव करण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी चीनला मदतीची याचना केली आहे.

पाकिस्तानमधील परिस्थिती इम्रान खान यांनी केलेल्या दाव्यांपेक्षा वेगळी आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १८४ वर पोहचली आहे. येथे सिंध प्रांतात सर्वाधिक १५० जणांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. याशिवाय खैबर पख्‍तूनख्‍वामध्ये १५, बलुचिस्तानमध्ये १०, पंजाबमध्ये २, राजधानी इस्लामाबादमध्ये २, तर गिलगिट बाल्टिस्तानमध्ये ५ रुग्ण आढळले आहे. पाकिस्तान मध्ये गेल्या २४ तासांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली यांनी जनतेला शांततेचं आव्हान केलं आहे.

पाकिस्तानची आर्थिक राजधानी असणाऱ्या कराचीत कोरोनाचे ३० रुग्ण आढळले आहे. द नेशनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे बचावासाठी अत्यावश्यक साधने नसल्याने दोन डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना विलनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या वृतांत म्हणले आहे की, येथील डॉक्टरांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष केले जात आहे.

चीनसमोर पसरले हात

कोरोनाचे संकट आल्यांनतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना मदतीसाठी चीनकडे पाठवले आहे. पाकिस्तानवर कोरोनाचे संकट आल्यानंतर त्यांनी हा दौरा नियोजित केला असल्याचे म्हणले जाते. तर राष्ट्रपती अल्वी यांचाही हा पहिलाच चीन दौर आहे.