‘POK’ बद्दल इम्रान खान करणार मोठी घोषणा ?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरबद्दल शुक्रवारी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादमध्ये एका सभेत हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. काश्मीरबद्दल पाकिस्तान मध्यस्थांतर्फे चर्चेला तयार आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते. पाकिस्तानची तयारी असली तरी या प्रश्नावर मध्यस्थांमार्फत तोडगा काढायला भारत तयार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

भारताने आपली भूमिका स्पष्ट केली असून काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधला द्वीपक्षीय मुद्दा असल्याचे भारताने म्हटले आहे. सीमेवरून होणारे हल्ले आणि भारत-चीन हे दोन्ही एकत्र येऊ शकत नाही. जोपर्यंत हे हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा करणार नसल्याचे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढला आहे. काश्मिरी लोकांसाठी प्रत्येक व्यासपीठावर पाकिस्तान आवाज उठवेल, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. काश्मिरी लोकांच्या हक्काच्या लढाईत ते एकटे नाही तर पाकिस्तान देखील त्यांच्या सोबत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

You might also like