धक्‍कादायक ! नक्षलींकडे अमेरिकन G-3 रायफल्स ; पाकिस्तानची ‘रसद’ असल्याचा सुरक्षा दलांचा ‘संशय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीसगढमधील कांकेर येथे नक्षलवाद्यांशी मध्यरात्री झालेल्या चकमकीला उत्तर देताना दोन नक्षलवादी ठार झाले झाले. या नक्षलवाद्यांकडे पोलिसांना पाकिस्तानी लष्कर वापरात असणारी अत्याधुनिक शस्त्रे सापडली आहेत. अमेरिकी बनावटीची जी-३ रायफल हि हत्यारे नक्षलवाद्यांकडे सापडल्याने पाकिस्तान नक्षलवाद्यांना मदत पुरवत असल्याचा संशय निर्माण होत आहे.

छत्तीसगढच्या रायपूर जिल्ह्यातील कांकेरमधील तडोकी भागात मुरणार आणि मेलापुर भागात नक्षलवाद्यांच्या सभेसाठी अनेक नक्षलवादी एकत्र जमणार होते. याची खबर सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर तात्काळ कारवाईसाठी पोलिसांनी वेगाने पावले उचलली. जिल्हा राखीव दलाचे पोलीस पथक याठिकाणी पोहोचल्यानंतर झालेल्या जोरदार चकमकीत दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. या कारवाईत २ नक्षलवाद्यांचा पोलिसांनी जागीच खात्मा केला.मुरनारच्या जंगल भागात मध्यरात्री हि चकमक घडली. त्यानंतर त्यांच्याकडील हत्यारे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके आढळून आली. ठार झालेल्या २ नक्षलवाद्यांच्या कमांडर पैकी एकावर ५ लाख तर एकावर १ लाखाचे इनाम होते.

चकमकीनंतर मिळालेल्या हत्यारांमध्ये एसएलआर रायफल, १२ बोर रायफल आणि एक ३०३ रायफल यांचा समावेश होता. याचबरोबर अमेरिकन मेड जी -३ रायफल्स देखील पोलिसांना सापडली. पाकिस्तानी लष्कराने हि हत्यारे अमेरिकेकडून घेतलेली असून पाकिस्तानी लष्करात यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे भारतात घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी हि रसद नक्षलवाद्यांना पाकिस्तान पुरवत असल्याचा अंदाज सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे.

याआधीही सापडली होती शस्त्रे :

हि बाब अत्यंत गंभीर असून याची कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. हि बाब नवीन नसून याआधीही अशी शस्त्रे सापडल्याचे सुरक्षा दलांनी स्पष्ट केले. मात्र आता हि शस्त्रे कोठून येतात हे शोधून काढणार असून पाकिस्तानी दहशतवादी किंवा लष्कराशी नक्षलवाद्यांचे काही संबंध आहेत का ते तपासावे लागेल असे सुरक्षा दलांनी सांगितले.

सिनेजगत

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी केले ‘असे’ काही

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

 

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like