करतारपूर गुरुद्वाराच्या देखभालीपासून शीख बांधवाना हटवलं

इस्लामाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पाकीस्तानने (pakistan) करतारपूर गुरुद्वारासंदर्भात नवी खेळी खेळली आहे. इम्रान सरकारने गुरुद्वाराच्या देखभालीचे काम पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून काढून ते एका नव्या संस्थेकडे ( sikhs-kartarpur-gurdwara-management-created-new-committee) दिले आहे. विशेष म्हणजे गुरुद्वाराच्या देखभालीसाठी तयार केलेल्या संस्थेत एकही शीख सदस्य नाही. आता करतारपूर गुरुद्वाराची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट यूनिटकडे सोपवली आहे.

ज्या युनिटकडे याची जबाबदारी सोपवली आहे. त्यातील सर्वच्या सर्व 9 सदस्य Evacuee Trust Property Board (ETPB) शी संबंधित आहेत. एवढेच नाही तर, असेही सांगण्यात येते, की पाकिस्तानी गुप्तचरसंस्था आयएसआय ETPB ला कंट्रोल करते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिटचा सीईओ मो. तारिक खानला केले आहे. पाकिस्तान सरकारने करतारपूर गुरुद्वारासंदर्भात जारी केलेल्या आदेशात गुरुद्वाराच्या माध्यमाने व्यापार करण्याची योजना आहे. आदेशात प्रोजेक्ट बिझनेस योजनेचाही उल्लेख आहे. अर्थात या गुरुद्वारापासून पैसा कमावण्याचा इम्रान सरकारचा इरादा आहे.

काय आहे करतारपूर कॉरिडोर
शीख बांधवांच्या पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक असलेले करतारपूर साहीब हे गुरुनानक देवांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानात असलेल्या या ठिकाणीच गुरुनानकांनी अखेरचा श्वास घेतला होता. पूर्वी शीख बांधव दूर्बीणीच्या सहाय्यानेच करतारपूर गुरुद्वाराचे दर्शन करायचे. मात्र, भारत-पाकिस्तान सरकारने एकत्रितपणे कॉरिडोर तयार केला आहे. भारतातील पंजाबमधील डेरा बाबा नानकपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत कॉरिडोरची निर्मिती केली आहे. तर पाकिस्ताननेही सीमेपासून नारोवाल जिल्ह्यातील गुरुद्वारापर्यंत कॉरिडोर तयार केला आहे. यालाच करतारपूर साहीब कॉरिडोर म्हणून संबोधले जाते.