काश्मीर मुद्यावर बोलावं म्हणून सौदी आणि UAE च्या मंत्र्यांकडे पाकिस्तानची ‘दयायाचना’, त्यांनी तोंड उघडलं नाही

नवी दिल्ली वृत्तसंस्था – सौदी अरेबिया आणि युएईला काश्मीरबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचे आवाहन पाकिस्तानने केले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयापासून, पाकिस्तान मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे पण तो अयशस्वी झाला आहे.

सौदीचे उप परराष्ट्रमंत्री अदेल बिन अहमद अल जुबैर आणि युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बुधवारी इस्लामाबादमध्ये दाखल झाले. मात्र, काश्मीरबाबत दोन्ही अरब देशांकडून कोणतेही विधान समोर आले नाही.

पंतप्रधान इम्रान खान आणि परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या बैठकीचा मुख्य मुद्दा काश्मीरचा होता. सौदी अरेबिया आणि युएईने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की सध्याची आव्हाने, तणाव कमी करण्यास आणि शांतता व सुरक्षेच्या वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देश सहकार्य करतील.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने जम्मू-काश्मीरमधून आपला निर्णय मागे घेण्यासाठी दबाव आणावा. इम्रान खान म्हणाले की यात सौदी अरेबिया आणि युएई फार मोठी भूमिका बजावू शकते.

परराष्ट्र मंत्रालय शहा महमूद कुरेशी म्हणाले, यावेळी पाकिस्तान आणि काश्मिरीच्या लोकांना मुस्लिम देशांकडून भक्कम पाठिंब्याची अपेक्षा आहे. या संदर्भात काश्मिरी जनतेच्या  एकता व पाठबळासाठी एक स्पष्ट संदेश देण्यात यावा.

सौदी आणि युएईच्या शीर्ष राजकारण्यांनी सांगितले की ते त्यांच्या नेतृत्त्वाच्या सूचना पाळण्यासाठी पाकिस्तान दौर्‍यावर आले आहेत. नंतर कुरेशी यांनी अधिकृत प्रेसशी बोलताना म्हटले की सौदी अरेबिया आणि युएई पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत यात शंका नाही. आम्हाला आशा होती की दोन्ही देश आम्हाला निराश करणार नाहीत. दोनीही देशांनी काश्मीर मुद्द्यावरून आमच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सौदी आणि युएईच्या राजनयिकांनी सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन्ही देशांच्या क्राउन प्रिन्सला फोन लावून बोलावले होते, त्यानंतर ही भेट झाली.

अलीकडेच युएईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ जाएद’ प्रदान केला, त्यानंतर पाकिस्तानमध्ये अरब देशांवर कडक टीका झाली. युएईने काश्मीरवर उघडपणे भारताला पाठिंबा दर्शविला होता आणि त्यास भारताची अंतर्गत बाब म्हणून वर्णन केले होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकताच आंतरराष्ट्रीय समुदायाला धमकीच्या मार्गाने सांगितले की काश्मीरकडे दुर्लक्ष केल्यास मुस्लिम जगात धोकादायक प्रतिक्रिया मिळेल. तथापि, अद्यापपर्यंत कोणत्याही मुस्लिम देशाने भारताविरूद्ध कोणतीही तीव्र भाष्य केलेले नाही. काश्मिरच्या मुद्दय़ावर अरब जग एकतर गप्प आहे किंवा भारताबरोबर आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, आपण इस्लामबद्दल कितीही बोललो तरी त्यांचे (अरब देश) आर्थिक हितसंबंध भारतात गुंतलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवणे इतके सोपे नाही.