आता हवाई मार्गानं आतंकवाद्यांसाठी येतायेत ‘बॉम्ब’ अन् ‘बंदूका’, ड्रोननं केली ‘नालायक’ पाकिस्तानची ‘पोलखोल’

जम्मू : पोलीसनामा ऑनलाइन  –   पाकिस्तानच्या कुरापती सतत सुरूच आहेत, याचा पुरावा त्याने पुन्हा एकदा दिला आहे. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेला पाक आता सीमेपलिकडून त्यांना मदत पाठवण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करत आहे. कठुआच्या पानसर परिसरात पाकिस्तानने पाठवलेला एक ड्रोन पकडण्यात आला आहे. सुरक्षा दलांच्या हाती लागलेल्या या ड्रोनमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्र सापडली आहेत.

drone

मिळाली इम्पोर्टेड शस्त्र

पकडण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये अमेरिकन कार्बाइन रायफल आणि ग्रेनेड मिळाले आहेत. युएसमध्ये तयार केलेले कार्बाइन, ते शस्त्र आहे ज्याने नाटो सैन्याने तालिबानमध्ये ऑपरेशन्स केली होती. ही शस्त्र एखाद्या मोठ्या दहशतवादी कटाकडे इशारा करत आहेत. कारण चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे यापूर्वी सुद्धा अशीच शस्त्र सापडली आहेत.

granet

मिळाले 7 ग्रेनेड

शंका अधिक गडद होण्याचे कारण म्हणजे ड्रोनमध्ये केवळ कार्बाइनच नव्हते तर सात ग्रेनेडसुद्धा आहेत. बीएसएफने हे ड्रोन ताब्यात घेतले असून त्याच्या जीपीएसला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे शस्त्र कुठे पाठवली जात होती हे समजणार आहे.

gun