पाकिस्तानमध्ये मोठा खुलासा ! ‘इमरान’ मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांकडे ‘दुहेरी’ नागरिकत्व, प्रचंड खळबळीनंतर विरोधकांना मिळाली संधी

इस्लामाबाद : पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील सात सदस्यांकडे दुहेरी नागरिकत्व आहे किंवा ते अन्य देशांचे स्थायी नागरिक आहेत. या मंत्र्यांची संपत्ती आणि राष्ट्रीयत्वाची माहिती मंत्रिमंडळ प्रभागाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहे. या खुलाशांनंतर विरोधक इम्रान खान सरकारची नाकेबंद करण्याच्या तयारीत आहेत. सतत समस्यांना तोंड देत असलेल्या इम्रान खान सरकारसाठी ही एक नवी समस्या होऊ शकते. विशेष बाब ही आहे की, जेव्हा इम्रान खान विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी सार्वजनिक कार्यालयांवर कब्जा करणार्‍या परदेशी नागरिकांवर टिका केली होती. यामुळे आता इम्रान कोणते स्पष्टकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पाकिस्तानचे माहिती मंत्री शिबली फराज यांनी केले ट्विट
पाकिस्तानचे माहिती मंत्री शिबली फराज यांनी ट्विट केले की, पंतप्रधान खान यांच्या निर्देशांनुसार ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. हे पाऊल सरकारवरील वाढत्या टिकेनंतर उचलण्यात आले आहे आणि पंतप्रधानांनी निकवर्तीयांची संपत्ती घोषित करण्यास सांगितले आहे. विरोधी पक्षांच्या मागणीनंतर या मंत्र्यांचे राष्ट्रीयत्व आणि संपत्तीचा खुलासा करण्यात आला आहे. हा खुलासा इम्रान यांच्यासाठी नवीन समस्या निर्माण करू शकतो.

इम्रान यांच्या विशेष सहाय्यकांची यादी
20 सल्लागार आणि पंतप्रधानांच्या विशेष सहायकांची संपत्ती आणि दुहेरी राष्ट्रीयत्वाची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. यामध्ये दुहेरी राष्ट्रीयत्व असणार्‍यांमध्ये शाहबाज गिल (युएस), नदीम बाबर (युएस), सैयद बुखारी (युके), यूसुफ (युएस) यांचा समावेश आहे. याशिवाय यादीत शहजाद कासिम (युएस), नदीम अफजल गोंडल (कॅनडा) आणि तानिया एस अड्रस (कॅनडा आणि सिंगापुर) यांची नावे आहेत.

कंगाल पाकिस्तानचे खरबोपती मंत्री
कॅबिनेट डिव्हिजनने या सर्व अनिर्वाचित सल्लागारांच्या संपत्तीची माहिती प्रकाशित केली आहे. बाबर यांच्याकडे पाकिस्तानमध्ये 310 मिलियन रुपयांची (तीन अरबपेक्षा जास्त) ची संपत्ती आणि अमेरिकेमध्ये 310 मिलियन रुपयांपेक्षा (तीन अरबपेक्षा जास्त) जास्त संपत्ती आहे. त्यांचा व्यापार राजधानीची एकुण संपत्ती 2.15 बिलियनपेक्षा जास्त आहे. बुखारी यांची पाकिस्तान आणि ब्रिटनमध्ये संपत्ती आहे. ते पाकिस्तानात टोयोटा लँड क्रूजर आणि ब्रिटनमध्ये चार वाहने – बेंटले (2017), रेंज रोव्हर आणि दोन मर्सिडीजचे मालक आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापुरमध्ये अड्रस यांची संपत्ती आहे.

अर्थ सल्लागार हाफजी शेख यांच्याकडे समारे 300 मिलियन रुपयांची (तीन अरब) संपत्ती आहे. व्यापार सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांच्याकडे 2 बिलियनपेक्षा जास्त संपत्ती आहे. लेफ्टनंन्ट जनरल असीम सलीम बाजवा यांच्याकडे 1.4 बिलियनपेक्षा जास्त किंमतीचे एक घर, भूखंड, व्यवसायिक भूखंड आणि शेत जमीनीसह (65 एकर) आठ संपत्ती आहेत. अर्थ सल्लागार हाफजी शेख यांच्याकडे सुमारे 300 मिलियन रुपयांची संपत्ती आहे. व्यापार सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांच्याकडे 2 बिलियनपेक्षा जास्त संपत्ती आहे.

निवडणूक न लढवता खात आहेत मलई
सर्व दुहेरी नागरिकत्व असणारे कॅबिनेट मंत्री अनिर्वाचित सदस्य आहेत. ते सर्व पंतप्रधानांचे विशेष सहायक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना एसएपीएमसुद्धा म्हटले जाते. पाकिस्तानमध्ये परदेशी नागरिक निवडणूक लढू शकत नाही. निवडणूक लढण्यासाठी सर्व उमेदवार आपल्या संपत्तीची घोषणा करतात. परंतु अनिर्वाचित सदस्यांसाठी अशी कोणतीही तरतूद नाही. या मंत्र्यांनी निवडणूक लढलेली नाही आणि इम्रान यांनी चतुराईने त्यांना आपल्या कॅबिनेटमध्ये जागा दिली आहे.