पाकिस्तान आपली ‘लायकी’ विसरून भारताला देतोय ‘धमकी’, कुरेशींची ‘ईद’च्या दिवशी बिघडली भाषा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले की, जर भारताने त्यांच्या देशाच्याविरूद्ध कोणतेही धाडस केले, तर पाकिस्तान त्यास सडेतोड प्रत्युत्तर देईल. यापूर्वी कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरचा मुद्दा मोठ्या ताकदीने लावून धरला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी नवनिर्मित राज्यात डोमिसाईल नियमांबाबत भारताविरूद्ध वाईट पद्धतीने प्रचार केला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने कोरोना संसर्गाच्या काळातही आपल्या नापाक हरकती कमी केलेल्या नाहीत. सीमेवर घुसखोरी करण्यासाठी पाकने आपले दहशतवादी लाँचिंग पॅड पुन्हा सक्रिय केले आहेत, तसेच आपल्या देशात दशहतवाद्यांच्या प्रमुखांना पूर्ण सूट दिली आहे.

मुल्तानमध्ये ईदच्या नमाजनंतर मीडियाशी चर्चा करताना कुरैशी यांनी रविवार म्हटले की, पाकिस्तानला शांतता हवी आहे, परंतु संयमाच्या त्याच्या भूमिकेला भारताने कमजोरी समजू नये. सरकारी रेडियो पाकिस्तानने कुरैशी यांचे हे वक्तव्य देताना म्हटले की, जर भारताने पाकिस्तान विरोधात कोणतेही धाडस केले तर त्यास तोडीसतोड प्रत्युत्तर दिले जाईल. कुरैशी म्हणाले, काश्मीरमधील कथित मानवाधिकारांचे उल्लंघनबाबत त्यांनी संयुक्त राष्ट्राचे महासचिव आणि इस्लामिक सहकार्य संघटनेशी संपर्क साधला आहे. त्यांनी म्हटले की, या दोन्ही जागतिक संघटनांच्या प्रमुखांना सांगितले आहे की, भारत आपल्या अंतर्गत परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानविरूद्ध अपप्रचाराचे कारस्थान करू शकतो.