CAA : ‘मृत्यू’ स्विकारू पण परत जाणार नाही, भारतात राहणार्‍या पाकिस्तानी नागरिकांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरी सुधारणा कायद्यावरून देशात मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरु असताना, असेही काही लोक आहेत जे कायद्यामुळे खूप खुश आहेत. हे ते लोक आहेत जे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून भारतात आले होते आणि यातील जास्त तर लोकांना अजून भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. त्यातच पंजाबमध्ये हजारोंच्या संख्येने असे लोक राहत आहेत जे पाकिस्तानातून आलेले आहेत.

पाकिस्तान से आकर पंजाब में रह रहे पाकिस्तानी नागरिक

पूर्ण कॉलनीचे लोक पाकिस्तानातून आलेले आहेत
पंजाबच्या खन्ना येथील एक कॉलनी अशी आहे ज्यामध्ये अनेक परिवार हे पाकिस्तानातून आलेले आहेत आणि सुखी जीवन जगत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना येथील लोकांनी पाकिस्तानातील हालाकीच्या दिवसांची माहिती दिली आहे. पाकिस्तान होणारे अत्याचार, जबरदस्तीने केले जाणारे धर्म परिवर्तन तसेच महिलांवर केले जाणारे अन्याय अशा अनेक गष्टीबाबत येथील लोकांनी भाष्य केले.

caaaa_122219112341.jpg

55 वर्षीय दर्शना पाकिस्तानातून पंजाबमध्ये आल्या या ठिकाणी त्यांनी एक घर भाड्याने घेतले. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्या जीवन जगत आहेत. घराची हालत अशी आहे की त्यांना स्वयंपाक देखील उघड्यावर बनवावा लागत आहे. तरीही त्या पुन्हा पाकिस्तानात जाण्यास तयार नाहीत.

इम्रान खान यांच्या पार्टीचे आमदार होते बलदेव सिंह
इम्रान खान यांच्या पक्षाचे आमदार राहिलेले बलदेव सिंह हे देखील पंजाबच्या खन्ना येथे राहतात. बलदेव हे एका घरामध्ये राहतात आणि कपड्यांच्या दुकानात काम करतात बलदेव यांनी नागरिकत्व मागितले होते मात्र आता कायदा आल्यामुळे बलदेव यांना नागरिकत्व मिळण्याच्या आशा वाढलेल्या आहेत. त्यामुळे येथे कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांनी मोदी शहांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/