काश्मिरात दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करण्यासाठी ड्रोनचा वापर

पोलिसनामा ऑनलाईन – दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानने अजुनही सुरूच ठेवले आहेत. दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढला आहे. पाकिस्तानचे हे प्रयत्न उधळून लावू असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक एन एस जामवाल यांनी दिला आहे.

‘ड्रोन’व्दारे सीमेजवळच्या भागात पाकिस्तानातून शस्त्र टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांसाठी ही शस्त्रे ठराविक भागात टाकली जातात. या ड्रोन्सचा छडा लावणे हे सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे हे दृष्ट प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दल सर्व प्रयत्न करत आहे . ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान काश्मीरातल्या दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. पाकिस्तानमधून या दहशतवाद्यांना राजौरी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठविण्यात आली होती. ती शस्त्रे आणण्यासाठी हे दहशतवादी निघाले होते त्यांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात 2 एके-56 रायफल्स, 180 राउंड, 6 एके-मॅगझीन्स, दोन चिनी पिस्तुल, 30 राउंडसोबतच तीन पिस्तुल मॅगझीन्स आणि चार ग्रेनेड एवढा शस्त्रसाठा आहे. त्याच्यासोबतच 1 लाख रुपये रोखही जप्त करण्यात आली आहे.