PAK चा आणखी एक ना’पाक’ निर्णय, समझौता एक्सप्रेसनंतर ‘दिल्ली-लाहोर’ बस सेवा ‘बंद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. कुरापती पाकिस्तानने आता दिल्ली-लाहोर बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पाकिस्तान दिल्ली लाहोर बस सेवा बंद करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर आता शुक्रवारी रात्री पाकिस्तानने आदेश जारी केले आहेत की दिल्ली – लाहोर बस सेवा बंद करण्यात येत आहे.

१९९९ मध्ये सुरु झाली होती बस सेवा
ही बस सेवा १९९९ मध्ये सुरु करण्यात आली होती, ही २००१ मध्ये बंद करण्यात आली होती. मात्र २००३ नंतर हीच बस सेवा पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली होती. तेव्हाचे भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या बरोबर झालेल्या लाहोर करारानंतर सुरु करण्यात आली होती.

थार एक्सप्रेस रोखण्याचा निर्णय
पाकिस्तानने या आधी समझौता एक्सप्रेस नंतर मुनाबाव – खोखरापार रेल्वे सेवा रद्द केली होती, याशिवाय थार एक्सप्रेस रोखण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राजस्थानच्या जोधापूरपासून थार एक्सप्रेस पाकिस्तानात जाते. जम्मू काश्मीरमधून ३७० कलम रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान काश्मीरमुद्दावरुन आता वाद उखरुन काढत आहे. पाकिस्तान या मुद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाद सांगत आहे तर भारत मात्र या मुद्द्याला अंतर्गत प्रकरण असल्याचे सांगत आहे.

दिल्लीच्या गेटशेजारी असलेल्या आंबेडकर स्टेडियम बस स्थानकापासून लाहोरला डीटीसी बस जाते. ही बस प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी रवाना करण्यात येते. पाकिस्तान पर्यटन विकास मंडळ दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी ही बस लाहोरवरुन दिल्लीला रवाना करतात.

आरोग्यविषयक वृत्त