व्यापार बंदी नंतर पाकिस्ताननं घेतला समझोता एक्सप्रेस बाबत ‘हा’ मोठा निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केल्यानंतर आता पाकिस्तानने समझोता एक्सप्रेस देखील रद्द केली आहे. आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या पाकिस्तानसाठी हा अधिक धोका असून भारताला मात्र या निर्णयामुळे काहीही फरक पडणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार समझोता एक्सप्रेसमधील प्रवासी सध्या अटारी बॉर्डरवर अडकले असून पाकिस्तानने त्यांच्याकडून पाठवण्यात येणारी रेल्वे रद्द केली आहे. त्यामुळे आता या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. पाकिस्तानने अचानक घेतलेल्या या निर्णयाची कोणतीही माहिती त्यांनी भारत सरकारला दिलेली नाही. पाकिस्तानने त्यांच्या ट्रेन ड्रायव्हर आणि गार्डला आपल्या गाडीसोबत पाठवण्यास मनाई केली आहे. अटारी आंतरराष्ट्रीय रेल्वे स्टेशनचे सुपरिटेंडेंट अरविंद कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधून समझोता एक्सप्रेस भारतात येणार होती. मात्र पाकिस्तानने संदेश पाठवून भारताला आपली रेल्वे घेऊन जाण्यास सांगितली. पाकिस्तान रेल्वेने सुरक्षेच्या कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या भारतीय रेल्वे ड्रायव्हर आणि गार्डकडे पाकिस्तानी व्हिजा आहे त्यांना हि रेल्वे आणण्यास पाठवण्यात येणार आहे।

दरम्यान, सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने भारताबरोबरचे राजनैतिक संबंध आणि व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर भारताबरोबर अनेक संबंध तोडण्याच्या निर्णयांपैकी हा एक निर्णय असल्याचे समजत आहे.

आरोग्यविषयक वृत्त