Pakistan | ‘पाकिस्तानी तालिबान’चा लष्करावर हल्ला, 15 जवानांचा मृत्यू, दहशतवाद्यांनी 63 सैनिकांचे केले अपहरण

नवी दिल्ली : पाकिस्तान (Pakistan) च्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील (Khyber Pakhtunkhwa) कुर्रम (Kurram) मध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (Tehrik i Taliban Pakistan) ने पाकिस्तानी लष्करावर (Pakistani Army) हल्ला केला आहे. या हल्ल्यात लष्कराच्या कॅप्टनसह 12 ते 15 जवानांचा मृत्यू झाला. तसेच हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तान तालिबान (Pakistan Taliban) च्या दहशतवाद्यांनी लष्कराच्या 63 जवानांचे अपहरण केले आहे.

सोमवारी प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या विरोधातील एका ऑपरेशनच्या दरम्यान पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले. या दरम्यान एक डझनपेक्षा जास्त सैनिकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 28 बलूच रेजिमेंटचे कॅप्टन अब्दुल बासित यांचा सुद्धा समावेश आहे. बासित पाक फ्रंटियर कॉर्प्स विंगच्या थाल स्काउट्समध्ये कार्यरत होते.

रेस्क्यूचा प्रयत्न करत आहे लष्कर

ही घटना पाकिस्तानच्या उत्तर खैबर पख्तूनख्वा म्हणजे केपीके प्रांतात घडली आहे, जिथे पाकिस्तानी लष्कराच्या 63 जवानांचे अपहरण करण्यात आले. संपूर्ण प्रकरण केपीकेच्या कोहाट विभागातील कुर्रम जिल्ह्यातील आहे. पाकिस्तानी मीडियानुसार ऑपरेशनमध्ये तीन दहशतवादी मारले गेले आणि सध्या लष्कराकडून शोध अभियान सुरू आहे.

तालिबानने दिला पाकिस्तानला इशारा

मागील काही दिवसापूर्वी वृत्त होते की, पाकिस्तानला तालिबानकडून एक मोठा इशारा मिळाला होता. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन (Suhail Shaheen) ने म्हटले होते की, तालिबानची अफगाणिस्तानमध्ये चर्चेद्वारे तडजोड करण्यात मदत करण्यासाठी पाकिस्तानचे स्वागत केले जाईल.

परंतु इस्लामाबाद आम्हाला निर्देश देऊ शकत नाही किंवा आपले विचार आमच्यावर थोपवू शकत नाही.
तालिबानी प्रवक्त्याने हे वक्तव्य पाकिस्तानच्या जियो न्यूजचा प्रोग्राम ‘जिगरा’मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केले होते.
हा प्रोग्राम रविवारी रात्री प्रसारित करण्यात आला.

तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्ही कोणतीही व्यक्ती आणि कोणत्याही गटाला अफगाणिस्तानच्या जमीनीचा वापर करू देणार नाही. मी अनेक मुलाखतींमध्ये म्हटले आहे आणि मला वाटते की, आमची स्थिती स्पष्ट आहे आणि सर्वांना माहित आहे.

दरम्यान अमेरिकन सैनिक परतल्यानंतर तालिबान वेगाने अ‍ॅक्टिव्ह होत आहे आणि देशाच्या मोठ्या भागावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
तालिबानने दावा केला आहे की, त्यांनी अफगाणिस्तानच्या 85 टक्के भागावर कब्जा केला आहे.
याच कारणामुळे पाकिस्तानने अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमेला घेराव घालण्यास सुरूवात केली आहे आणि देखरेख वाढवली आहे.

Web Title : pakistan tehrik i taliban pakistan attacked pakistan army in khyber pakhtunkhwa kurram

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | पुणे जिल्हयात सुमारे 10000 अपार्टमेंट ! आता क्षेत्रफळानुसार अपार्टमेंटधारकांना द्यावा लागणार मेंटेनन्स, जाणून घ्या

Pimpri Crime News | आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बिल्डर मेहतासह 7 जणांवर गुन्हा दाखल; पार्किंगसाठी सोय करुन देतो सांगून केली होती फसवणूक

Pune Crime News | लग्नाच्या आमिषाने तरूणीसोबत केली ‘मज्जा’ अन् दुसरीसोबत केला विवाह, तरूणावर बलात्काराचा FIR