आणखी सहा वर्षांनी पाकिस्तान भारताचा भाग असणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०२५ पर्यंत पाकिस्तान भारताचा भाग असेल असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केले आहे. पुढील सहा वर्षात पाकिस्तान भारताचा भाग असेल तेव्हा कराची, लाहोर, रावळपिंडी आणि सियालकोट या ठिकाणी आपण सर्व घरे घेऊ शकेल असे इंद्रेश कुमार म्हणाले आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पाकिस्तान अस्तित्वात नव्हते. १९४५ पूर्वी पाकिस्तान हा हिंदुस्थानचा भाग होता. म्हणून २०२५ पासून पुन्हा हिंदुस्थान तयार होणार आहे असे इंद्रेश कुमार म्हणाले आहेत. सीमाविरहित राष्ट्र तयार करण्यासाठी बांग्लादेश देखील तयार होता. युरोपीय युनियन प्रमाणे हिंदुस्थान युनियन २०२५ पर्यंत तयार करण्यात येईल असे इंद्रेश कुमार म्हणाले आहेत.

भारत सरकारने प्रथमच काश्मीरबाबत कठोर भूमिका घेतली आहे. लष्कर राजकीय इच्छा शक्तीवर चालते. आता राजकीय इच्छा शक्ती बदलली आहे. त्यामुळे आगामी सहा वर्षात आपण लाहोरमध्ये घर घेऊ शकणार आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनची मदत घेण्याची गरज पडणार नाही. युरोपीय युनियन प्रमाणे भारत हा अखंड भारत युनियन बनण्याच्या वाटेवर आहे असे इंद्रेश कुमार म्हणाले आहेत.