पाकिस्तानला मोफत मिळणार भारतात तयार झालेली कोरोना लस, 1 कोटी 70 लाख डोस मिळण्याचा मार्ग मोकळा

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – उशीरा का होईना पाकिस्तानमध्ये सुद्धा कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा होत आहे. पाकिस्तानचे इम्रान सरकार अजूनपर्यंत कोरोना लसीचा एक सुद्धा डोस खरेदी करू शकलेले नाही, परंतु चीनने त्यांना 5 लाख डोस मोफत दिले आहेत, जे आणण्यासाठी पाकिस्तानहून विमान पाठवण्यात आले आहे. चीनी डोस पाकिस्तानमध्ये पोहचण्यापूर्वी पाकिस्तान त्यावेळी भावूक झाला जेव्हा त्यांच्यासाठी 1.70 कोटी भारतीय लसीचे डोस मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांना जागतिक कोवॅक्स प्रोग्रॅमच्या अंतर्गत ही मदत दिली जात आहे.

पाकिस्तानने सर्वप्रथम ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका आणि सीरम इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून तयार करण्यात आलेली लस कोविशील्डला सर्वप्रथम आपत्कालीन मंजूरी दिली, परंतु इम्रान खान सरकारचा खजिना रिकामा आहे आणि भारत सरकारकडे लस मागण्याची त्यांची हिंमतसुद्धा नव्हती. मात्र, पाकिस्तानने हे बॅकडोअरने मिळवण्याच्या प्रयत्नांतर्गत राज्य सरकारे आणि खासगी सेक्टरला खरेदीची सूट दिली होती.

या दरम्यान, रविवारी इम्रान खान यांचे विशेष सहायक (आरोग्य) डॉ. फैसल सुल्तान यांनी घोषणा केली की, पुढील महिन्यात (फेब्रुवारी) पाकिस्तानला एस्ट्राजेनेकाची व्हॅक्सीन सुद्धा मिळत आहे. त्यांनी सांगितले की, 60 लाख डोसची डिलिव्हरी मार्चपर्यंत होईल तर जूनपर्यंत 1.70 कोटी डासे मिळतील.

असद उमर यांनी ट्विट केले, कोविड व्हॅक्सीन आघाडीवर खुशखबर. कोवॅक्सकडून मिळालेल्या पत्रात 2021 च्या पहिल्या सहामाहीत एस्ट्राजेनेका व्हॅक्सीनचे 1.70 कोटी डोस मिळण्याबाबत म्हटले आहे. फेब्रुवारीपासून सुरुवात झाल्यानंतर मार्चपर्यंत 60 लाख डोस उपलब्ध होतील. आम्ही 8 महीन्यापूर्वी कोवाक्स प्रोग्रॅमवर हस्ताक्षर केले होते.

एका अन्य ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, हे सांगताना आनंद होत आहे की, सिनोफार्मा (चायनीज व्हॅक्सीन कंपनी) कडून 5 लाख डोज मिळाल्यानंतर पहिल्या तिमाहीत 70 लाख डोस एस्ट्राजेनेका व्हॅक्सीनचे मिळणार आहेत. हे लोकांना मोफत दिले जातील. पाकिस्तानमध्ये लसीकरण पुढील आठवड्यात सुरू होत आहे आणि सर्वप्रथम हेल्थकेयर वर्कर्सला लस दिली जाईल.