Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पाकिस्तानमध्ये एक मोठी रेल्वे दुर्घटना ( Pakistan Train Accident ) घडली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 33 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 50 लोक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना ( Pakistan Train Accident )  सिंध प्रांताच्या डहारकीमध्ये घडली. हे ठिकाण येथील घोटकी जिल्ह्यात आहे. येथे दोन प्रवाशी ट्रेन मिल्लत एक्सप्रेस (अप) आणि सर सैय्यद एक्सप्रेस (डाऊन) समोरासमोर धडकल्या. 33 लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला डेप्युटी कमिश्नरने दिला आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या ट्रेनची धडक रेती आणि डहारकी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान झाली. मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अनेक लोक ट्रेनमध्ये सुद्धा अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. येत्या काही तासात मृतांची संख्या वाढू शकते. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहचले. यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले. अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, सध्या ते सांगू शकत नाहीत की, ट्रेन सेवा पुन्हा सुरू होण्यास किती वेळ लागेल. येथून जाणार्‍या ट्रेन रद्द केल्या जाऊ शकतात.

मार्चमध्ये सुद्धा झाली होती दुर्घटना
यापूर्वी याच वर्षी मार्चमध्ये सुद्धा पाकिस्तानमध्ये रेल्वे दुर्घटना झाली होती. येथे कराची एक्सप्रेस अपघातग्रस्त झाली होती. ही ट्रेन लाहोरहून निघाली होती आणि सुक्कुर प्रांतात अपघाग्रस्त झाली. तिचे आठ कोच रूळावरून घसरले होते. अपघातात एका व्यक्तीची मृत्यू झाला होता. तर 40 च्या जवळपास प्रवाशी जखमी झाले होते. यावेळी अनेक लोक ट्रेनच्या आत अडकले होते आणि ट्रेन सेवा रद्द करण्यात आली होती.

7 जून राशीफळ : आज मेष राशीत चंद्र, ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग, इतरांसाठी असा आहे सोमवार

मुंबईत 4 मजली इमारतीचा भाग कोसळला; वांद्रे परिसरातील घटनेत एकाचा मृत्यु, चौघे जखमी

E-Pass बाबत ‘संभ्रम’ आणि ‘गोंधळ’ ! पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच; आज येणार अधिक स्पष्टता – पोलीस

दुसर्‍यांदा पिता बनला ‘प्रिन्स हॅरी’, पत्नी ‘मेगन मर्केल’ने मुलीला दिला जन्म, ‘लिली डायना’ ठेवले नाव