अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या ‘या’ खास पंटरला वाचवण्यासाठी पाकिस्तानचा ‘आटापीटा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी भारताला हवा असलेला दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. काल देखील अमेरिकेने दाऊद हा पाकिस्तानमध्येच असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता त्याचा खास माणूस जाबीर मोतीवाला याच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत आहे. तो सध्या लंडनच्या कारागृहात असून अमेरिका त्याला आपल्या हवाली करण्याची मागणी करत असून पाकिस्तान मात्र तो अमेरिकेकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका त्याला आपल्याकडे घेऊन पाकिस्तानवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपली माहिती मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या हाती लागेल अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्याच्याकडे पाकिस्तान आणि आयएसआय संबंधित मोठ्या प्रमाणावर माहिती असल्याने पाकिस्तानला हि भीती सतावत आहे.

२०१८ मध्ये जाबीर मोतीवाला याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. जाबीर मोतीवाला हा दाऊदच्या अनेक कारभारांचा साक्षीदार तसेच दाऊदचा एजंट म्हणून देखील तो काम करत होता. ड्रग्ज, मनिलॉड्रींग त्याचप्रमाणे अनेक अवैध धंद्यात दाऊदने पैसे गुंतवले आहेत. या सगळ्या धंद्यांवर तो लक्ष ठेवण्याचे काम करत असे. सध्या जबीरचे हे प्रकरण इंग्लंडच्या कोर्टात असून त्याच्याबाबतीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे सध्या लक्ष लागून आहे. त्याचबरोबर जाबीर हा गंभीर आजाराने त्रस्त असून त्याला अमेरिकेच्या हवाली करण्यात येऊ नये अशी मागणी देखील त्याच्या वकिलांनी केली आहे.

दरम्यान, काल अमेरिकेने दाऊद हा पाकिस्तानमध्येच असल्याचा दावा केल्यानंतर आता जाबीर याला आपल्या हवाली करण्याच्या अमेरिकेच्या दाव्यानंतर पाकिस्तानच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय