‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान भाड्याने देण्याची केली घोषणा

नवी दिल्ली : आर्थिक संकटातून (financial crunch) जात असलेल्या पाकिस्तान आता पूर्णपणे कंगाल झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानची (Pakistan) अर्थव्यवस्था (Economy) गाळात अडकली आहे, आणि याचा अंदाज या गोष्टीवरून सुद्धा लावता येऊ शकतो की, पाकने पंतप्रधानांचे निवासस्थान भाड्याने देण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (prime minister imran khan) यांनी इस्लामाबाद येथील निवासस्थान (Residence in Islamabad) भाड्याने देण्याची घोषणा केली आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये पाकिस्तानच्या सत्ताधारी पक्षाने पंतप्रधानांचे निवासस्थान विद्यापीठात बदलण्याचा निर्णय घेतला होता. ज्यानंतर पीएम इम्रान खान यांनी हे निवासस्थान रिकामे केले. परंतु आता सरकारने विद्यापीठाची योजना रद्द केली आहे.

’Samaa TV’ च्या एका रिपोर्टनुसार ही योजना रद्द केल्यानंतर आता पीएम निवासस्थान भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक मीडियाने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या फेडरल सरकारने पीएम निवासस्थान आता कल्चरल, फॅशन, एज्युकेशनल आणि इतर इव्हेन्ट्ससाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. इस्लामाबादमध्ये पीएम इम्रान खान यांचे हे निवासस्थान रेड झोनमध्ये येते.

पीएम निवासस्थान (PM Residence) भाड्याने देण्यासाठी आणि त्याची देखरेख ठेवण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कमेटी निवासस्थानात होणार्‍या कार्यक्रमांदरम्यान कायद्याचे पालन आणि पीएम हाऊसशी संबंधित डेकोरमचा मेन्टन ठेवण्यावर लक्ष ठेवणार आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट नुसार फेडरल कॅबिनेट लवकरच पीएम निवासस्थानातून होणार्‍या
उत्पन्नाबाबत सुद्धा चर्चा करणार आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, देशातील लोक महागाईने हतबल झाले असून
जगणे अवघड होऊन बसले आहे. सरकारी कर्मचार्‍यांचे पगार करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत.

हे देखील वाचा

Satara Crime | दुध टँकरची 6 वाहनांना धडक; पुण्यातील दोघांचा मृत्यू

Tokyo Olympics 2020 | नीरज चोपडा याने पहिल्याच ‘भालाफेकी’त रचला ‘इतिहास’ फायनलमध्ये मिळविले स्थान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pakistan under financial crunch announces prime minister imran khan islamabad residence put on market rent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update