गरिबीनं पछाडलेल्या पाकिस्तानला इम्रान खाननं बनवलं ‘कंगाल’, ‘हे’ आकडे बनले पुरावा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबत अनेकदा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळेस त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. आता तर इम्रान खान यांना स्वतःच्याच देशातील नागरिकांकडून शिव्या खाव्या लागत आहेत. याचे कारणही तसेच आहे, आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला इम्रान खान यांनी अजून कंगाल केले आहे.

ऑगस्ट 2018 मध्ये इम्रान खान यांनी पाकिस्तानची सूत्रे हातात घेतली होती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार इम्रान खान यांनी सत्ता हातात घेतल्यापासून पाकिस्तानची हालत आणखी खराब झाली आहे.

इकॉनमिक ग्रोथ
पाकिस्तानची इकॉनमिक ग्रोथ  5.5 % खाली कोसळून 3.3 % पर्यंत येऊन पोहचली आहे. पुढील वर्षी हाच दर 2.4 % इतपर्यंत पोहचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रुपयांमध्ये घसरण
पाकिस्तानातील चलनात देखील मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. गेल्या वर्षी एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत 122 रुपये इतकी होती मात्र तीच किंमत आता 156 वर पोहचली आहे. जाणकारांच्या मतानुसार यामध्ये अजून घसरण होऊ शकते.

महागाई दर
इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासून महागाईच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी हा दर  3.9 % इतका होता तर आता हाच दर 7.3 % पोहचला आहे. पुढील वर्षापर्यंत हा दर 13 % जाऊ शकतो.

FDI चे हाल
या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत परकीय गुंतवणुकीमध्ये 51.7 % नी कमी आलेली आहे. विदेशी प्राइवेट इन्वेस्टमेंट मध्ये देखील 64.3 % घसरण झाली आहे.

6 लाख कोटींचे कर्ज
देशाला चालवण्यासाठी पाकिस्तान वारंवार कर्ज घेत आहे.  मार्च 2019 पर्यंत पाकिस्तानवर 85 बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये  6 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. पाकिस्तानने पश्चिम युरोपातील आणि पूर्वेकडील अनेक देशांकडून कर्ज घेतलेले आहे. पाकिस्तानला सगळ्यात जास्त कर्ज चीनने दिलेले आहे तसेच पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलेले आहे.

Visit : Policenama.com