भारताविरुद्ध कट रचण्याच्या तयारीत चीन आणि पाकिस्तान, असा झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचं बिंग फुटलं आहे. यासाठी चीन आणि पाकिस्तानची युती कोणत्या मार्गाने सुरू आहे, याविषयी काही खास छायाचित्रे आणि माहिती मिळाली आहे. पाकिस्तानचे रेंजर्स दहशतवाद्यांच्या शस्त्रास्त्रांची कमतरता भागवण्यासाठी त्यांना चिनी शस्त्रे देत असल्याचे उघड झाले आहे. जैसलमेरमधील पाकिस्तानी सीमेवरुन पाकिस्तानच्या शेरशाह पोस्टची ही ताजी छायाचित्रे समोर आली आहेत.

8 सप्टेंबर रोजी पाकिस्तान रेंजर्सच्या याच पोस्टवरून मादक पदार्थांच्या तस्करीचा भारतीय सैन्याने प्रयत्न अयशस्वी केला होता. त्या घुसखोरांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारले होते. परंतु त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांनी हे सिद्ध केले की चिनी शस्त्रे भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरांची शास्त्रत्रांची कमतरता भागवत आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या 15 वर्षांत प्रथमच राजस्थानातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पाकिस्तान घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान देत आहे चिनी शस्त्रे-

गुप्तचर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आता भारत-पाकिस्तान सीमेवर घुसखोरांशी शस्त्रास्त्रांची कमतरता भागवत आहे. ही शस्त्रे सीमेवर तैनात केलेल्या सुरक्षा जवानांना सापडली आहेत. महत्त्वाचे म्हणजे गुप्तचर यंत्रणेकडून असेही निदर्शनास आणून दिले आहे की घुसखोरांना उपलब्ध असलेले पिस्तूल चिनी बनावटीचे आहेत. ही शस्त्रास्त्रे तीन ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर ही ठिकाणे आहेत.