पाकिस्तानकडून बालाकोट सेक्टरमध्ये ‘फायरिंग’

श्रीनगर : पाकिस्तान लष्कराने युद्ध बंदीचे उल्लंघन करीत मंगळवारी सकाळी बालाकोट सेक्टरमध्ये गोळीबार केला.जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये सीमा रेषेवर हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला आहे.

बालाकोट सेक्टरमधील लाईन ऑफ कंट्रोलवर आज सकाळी छोट्या शस्त्रातून गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तोफगोळ्यांचा मारा सुरु करण्यात आला. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय सीमा सुरक्षा दलाने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता पाकिस्तान व्याप काश्मीरबाबत दोन्ही बाजूकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. अशावेळी पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याने सीमेवर तणाव वाढला आहे.