पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, BSF चा अधिकारी झाला शहीद

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत मंगळवारी (दि. 1) गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक BSF चा अधिकारी शहीद झाला आहे. चिथावणी देण्यासाठीच पाकिस्तान असे कृत्य करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र घुसखोरीचा प्रयत्न असो किंवा शस्त्रसंधीचे उल्लंघन भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पाकिस्तानच्या (Pakistan) कुरापती वाढताना दिसत आहे. 27 नोव्हेंबरलाही पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामध्ये 2 जवान शहीद झाले होते. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे ड्रोन्स अनेकदा दिसले होते. मात्र सोमवारी पाकिस्तानचे लढाऊ विमान सीमेजवळ दिसल्याने खळबळ उडाली होती. हे विमान चुकून आले की जाणिवपूर्वक आले होते याची माहिती लष्कर घेत आहेत. सोमवारी सकाळी हे विमान दिसले होते. त्या विमानाने सीमा रेषेचा भंग केला नसला तरी ते सीमा रेषेजवळ आल्याने हा गंभीर प्रकार समजला जातो. नियंत्रण रेषेजवळ तैनात जवानांना या विमानांचा आवाज आला आणि धूरही दिसला. त्यानंतर अलर्ट झालेल्या लष्कराने त्या घटनेचा अभ्यास सुरू केला आहे. हे विमान प्रशिक्षण देणार होतं की तैनात केलेले होते. त्यावर काही हेरगिरीची उपकरणे होती का या सगळया गोष्टीचा अभ्यास केला जात आहे. गेल्या काही महिन्यांंपासून काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रपुरवठा केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्याच बरोबर त्याम माध्यमातून ड्रग्जची तस्करीही केली जात होती.