पाकिस्तानकडून पुन्हा ‘सीजफायर’चे उल्‍लंघन, पुंछमध्ये गोळीबार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानने पुन्हा एकदा सिजफायरचे उल्लंघन केले. जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा गोळीबार केला. पाकिस्तानच्या या कृतीवर प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांनी देखील गोळीबार केला. मात्र या गोळीबारात कोणतीही जीवितहानी आल्याची माहिती मिळालेली नाही.

पाकिस्तानी सेनेनं पुन्हा एकदा या कराराचे उल्लंघन करत फायरिंग सुरु केली आहे. अजूनही या भागात विशिष्ट कालावधीत फायरिंग होत आहे. शनिवारी देखील पाकिस्तानी सैन्याने या ठिकाणी गोळीबार करत कराराचे उल्लंघन केले. त्याच दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे राज्याच्या दौऱ्यावर होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने मोर्टारने हल्ला करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात गोळीबार देखील केला. सुरुवातीला पाकिस्तानकडून कृष्णाघाटी मनकोट आणि शाहपुर भागात गोळीबार केला. याआधी १७ जुलै रोजी देखील सोपोरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाला यश आले होते.

दरम्यान, पाकिस्तानकडून अशा प्रकारचे हल्ले अजूनही सुरु असून राज्यातील पोलिसांच्या विशेष अभियान दल आणि राष्ट्रीय रायफल्सच्या एका टीमने या दहशतवाद्यांना चारी बाजुंनी घेरल्यानंतर केलेल्या हल्ल्यात हा दहशतवादी मृत पावला होता.

आरोग्यविषयक वृत्त –