सीमेवर पाककडून गोळीबार सुरुच, तीन नागरिकांचा मृ्त्यू

श्रीनगर : वृत्तसंस्था – एकीकडे भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना शुक्रवारी पाकिस्तानने भारतात सोडले. तर दुसरीकडे मात्र सीमेवर अजूनही तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नागरी भागांवर गोळीबार करण्यात येत आहे. यात एकाच कुटुंबातील तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू काश्मीरमधील मेंढर, उरी, पुँछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात य़ेत आहे. या गोळीबारात पुंछ जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी रेंजर्सकडून मोर्टर, ग्रेनेड हल्ला केला जात आहे. पाकिस्तानी रेंजर्सने सामान्य नागरिकांना लक्ष केले आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर शुक्रवारी कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे पाच जवान शहिद झाले आहेत. यात सीआरपीएफचा एक निरीक्षक आणि जवान व त्यांच्याबरोबर लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. तर आणखी चार जवान जखमी झाल्याचे समोर आले आहे. झालेल्या चकमकीत कुपवाडा जिल्ह्यात

You might also like