काही तरीच ! विराट पाकिस्तानकडून T – 20 वर्ल्ड कप खेळणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यावर लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. नुकताच भारताने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर जळफळाट झालेला पाकिस्तान सतत भारताला अणुयुद्धच्या धमक्या देत आहे. त्यानंतर आता याच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पाकिस्तान या अणुयुद्धात भारताला पराभूत करेल आणि त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली हा पाकिस्तानकडून क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सध्या मोठा व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत  विराट कोहली 2025 मध्ये पाकच्या संघातून  क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. या व्हिडिओत दाखवण्यात आल्याप्रमाणे 2025 टी-२० क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरु असून पाकिस्तान याचा यजमान असून हा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात हि लढत होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर हि लढत श्रीनगरमध्ये होत असल्याचे देखील दाखवण्यात आले आहे.

त्यानंतर या सामन्याचे संचालन करणारा म्हणतो कि, पाकिस्तानकडे बाबर आझम आणि विराट कोहली  यांच्या रूपाने दोन अप्रतिम फलंदाज आहेत. त्याचबरोबर एक कुटुंब हा सामना पहात असल्याचे देखील दाखवण्यात आले आहे. या कुटुंबातील लहान मुलगी विराट कोहली हा आधी भारताकडून खेळत होता ना असे विचारते. त्यावेळी एक मुलगा म्हणतो कि, कोण भारत ? तसेच व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण भारतासह आणि पाकिस्तान आणि बांग्लादेश देखील हिरव्या रंगात दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

दरम्यान, सध्या सोशल मोडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालत असून यावर भारतीयांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.